गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी! मुंबईत बेस्ट बस आणि मेट्रोने रात्री उशिरापर्यंत करता येणार प्रवास, वेळापत्रक पाहा

Mumbai Ganeshotsav 2026 BEST Bus Special Service Timings: गणेशोत्सव २०२६ दरम्यान मुंबईतील गणेशभक्तांसाठी मोठी दिलासादायक बातमी. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान बेस्टच्या १० मार्गांवर २६ जादा बसगाड्या रात्री साडेदहा ते सकाळी ६ वाजेपर्यंत धावणार आहेत.
MumbaiGaneshotsav
MumbaiGaneshotsavsaam tv
Published On

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागाने विशेष नियोजन केले आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील प्रमुख गणेश मंडळे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या भविकांसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या रात्रभर धावणार आहेत.

MumbaiGaneshotsav
Metro 13 Mumbai: मीरा-भाईंदर ते वसई-विरार आता काही मिनिटांत; मेट्रोसह वाहनांसाठी नायगाव खाडीवर दुमजली पूल

लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी यांसह दक्षिण मुंबईतील प्रमुख विभगांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत एकूण 10 बसमार्गांवर 26 जादा बसगाड्यांची सेवा उपलबद्ध करून दिली जाणार आहे. या विशेष बससेवेचा लाभ गणेशभक्तांना रात्री साडेदहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत घेता येणार आहे. त्यामुळे भाविकांना तसेच विसर्जनासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

MumbaiGaneshotsav
Ganpati Festival: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणात जाण्यासाठी एसटीच्या ५२२० बसेस धावणार, सरकारकडून मोठं गिफ्ट

जादा बसगाड्यांची व्यवस्था

ओशिवरा, शिवाजीनगर, देवनार, बॅकबे, मुंबई सेंट्रल, वरळी, सांताक्रुझ, वडाळा आणि काळा किल्ला या आगारांमार्फत करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील गर्दीच्या भागांसोबतच पश्चिम उपनगरातील गणेशभक्तांसाठीही विशेष सुविधा उपलब्ध राहणार आहे. ओशिवरा आणि सांताक्रुझपर्यंत जादा बसगाड्या धावणार असल्याने रात्रीच्या वेळी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

MumbaiGaneshotsav
Ganeshotsav 2026: मुंबईतील गणेश मंडळांसाठी BESTची ‘वीज गाईडलाईन’, ११ अटी पूर्ण केल्यावरच मिळणार जोडणी

मेट्रो-3 अ‍ॅक्वा लाइन करता येणार रात्री उशिरापर्यंत प्रवास

बेस्ट बससोबतच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने गणेशोत्सवाच्या काळात मेट्रो-3 अर्थात अ‍ॅक्वा लाइनची सेवा 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान मध्यरात्री 12 वाजे[पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कफ परेडआणि आरे जे.व्ही.एल.आर या दोन्ही टर्मिनल स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10.30 वाजता निघते. त्यामुळे रात्री उशिरापपर्यंत गणपती बाप्पाचे दर्शन घेणाऱ्या भक्तांना परतीच्या प्रवासासाठी मेट्रोचा देखील पर्याय उपलबद्ध राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com