Ganpati Festival: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणात जाण्यासाठी एसटीच्या ५२२० बसेस धावणार, सरकारकडून मोठं गिफ्ट

Good News for Ganesh Devotees: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकणात जाण्यासाठी एसटीच्या ५२२० बसेस धावणार आहेत.
Ganpati Festival: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणात जाण्यासाठी एसटीच्या ५२२० बसेस धावणार, सरकारकडून मोठं गिफ्ट
Good News for Ganesh DevoteesSaam Tv
Published On
  • गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी आनंदवार्ता

  • कोकणात मुंबईवरून एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

  • मुंबईहून कोकणात गणपतीसाठी एसटी बस आरक्षण

  • १० ऑगस्टपासून कोकणात गणपतीसाठी जाण्यासाठी एसटीचे गट आरक्षण

गणेशोत्सवासाठी मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने गणेशभक्तांना मोठं गिफ्ट दिलं आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एसटी सज्ज झाले आहे. एसटीकडून कोकणात गौरी-गणपतीला जाण्यासाठी एसटीच्या ५,२२० जादा बसेस सोडण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांचा कोकणात जाण्याचा प्रवास गर्दीमुक्त आणि आरामदायी होणार आहे.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी आज एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत परिवहन मंत्र्यांनी आढावा घेतला. या बैठकीमध्येच कोकणात गणेशोत्सवासाठी ५,२२० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत जादा बसेस कोकणात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना या एसटी बसेसचा फायदा होईल. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एसटीकडून कोकणात जाण्यासाठी जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

Ganpati Festival: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणात जाण्यासाठी एसटीच्या ५२२० बसेस धावणार, सरकारकडून मोठं गिफ्ट
Ganesh Festival: गणेशोत्सव मंडळात महिला नाचवल्या, गणेशमूर्तीसमोर अश्लील डान्स ; बघा संतापजनक VIDEO

कोकणामध्ये गणेशोत्सवाला जाण्यासाठी १० ऑगस्टपासून गट आरक्षणाला सुरुवात होणार आहे. किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी १० ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. गट आरक्षणामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडे सवलत लागू राहणार आहे. या जादा बसेसचे आरक्षण npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवाशांना बसस्थानकांवर तसेच MSRTC Bus Reservation या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे आरक्षण करता येणार आहे.

Ganpati Festival: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणात जाण्यासाठी एसटीच्या ५२२० बसेस धावणार, सरकारकडून मोठं गिफ्ट
Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सांगितले की, 'गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी मोठा जिव्हाळ्याचा सण आहे. गणपती बाप्पा, मुंबईतील कोकणचे रहिवासी आणि एसटी यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही नफा-तोट्याचा विचार न करता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सेवेसाठी एसटी सज्ज झाले आहे. यावर्षी सुमारे ५,२२० जादा बसेस कोकणातील विविध मार्गांवर धावणार आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com