Accident: भाविकांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकची कारला धडक; ६ मित्रांचा जागीच मृत्यू

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
Accident: भाविकांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकची कारला धडक; ६ मित्रांचा जागीच मृत्यू
Madhya Pradesh AccidentSaam Tv
Published On
  • मध्य प्रदेशमध्ये महामार्गावर अपघाताचा थरार

  • भरधाव ट्रकची कारला धडक

  • अपघातामध्ये सहा भाविकांचा मृत्यू

  • महाकाल दर्शनाहून परतताना घडली घटना

मध्य प्रदेशमध्ये महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. महाकालच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने कारला धडक दिली. या अपघातामध्ये ६ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. धार जिल्ह्यातील बदनावर-उज्जैन महामार्गावर रविवारी दुपारी ही घटना घडली. अपघातामध्ये जखमी झालेले सर्व तरुण गुजरातचे होते.

Accident: भाविकांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकची कारला धडक; ६ मित्रांचा जागीच मृत्यू
Bus Accident News : प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, ७ जणांचा जागीच मृत्यू; ११ प्रवासी गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, पंचकवासा गावाजवळ दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. चुकीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने भाविकांच्या कारला धडक दिली. अपघातामध्ये कारचा चुराडा झाला. कारमधील ६ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या तरुणाला उपचारासाठी बदनावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Accident: भाविकांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकची कारला धडक; ६ मित्रांचा जागीच मृत्यू
Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, भरधाव कार तलावात कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेले सर्व तरुण हे गुजरातच्या बडोदरा येथे राहणारे होते. हे सर्वजण मित्र होते आणि दर्शनासाठी महाकालला आले होते. उज्जैन येथे भगवान महाकालच्या दर्शनासाठी ते आले होते. दर्शन घेतल्यानंतर ते गुजरातला घरी परत जात होते. त्याचवेळी चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने त्याच्या कारला जोरदार धडक दिली. ट्रकमध्ये लोखंड होते. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भयंकर होती की कारचा चुराडा झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहे.

Accident: भाविकांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकची कारला धडक; ६ मित्रांचा जागीच मृत्यू
Bus Accident : पुण्यात भीषण अपघात! PMPML बसच्या धडकेत २ महिलांचा मृत्यू

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्यांचे मृतदेह आणि जखमीला बाहेर काढण्यात आले. कारचा चुराडा झाल्यामुळे मृतदेहाचे तुकडे झाले होते त्यांना बाहेर काढणं देखील कठीण आहे. सहाही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर एका जखमीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com