Accident : स्कूल बसमधून पडून ७ वर्षांच्या ईश्वरी ठाकरेचा मृत्यू; धक्कादायक घटनेनं खळबळ

Amravati school bus accident today : अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे स्कूल बसमधून उतरताना ७ वर्षांच्या ईश्वरी ठाकरेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Accident News :  स्कूल बसमधून पडली, चाकाखाली चिरडून ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
School Bus Accident NewsSaam Tv
Published On

अमर गटारे, अमरावती प्रतिनिधी

Amravati school bus accident : स्कूल बसमधून खाली उतरताना अपघात झाल्याने ७ वर्षांच्या मुलीचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. ईश्वरी ठाकरे असे या मृत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ईश्वरी स्कूल बसमधून खाली उतरत होती. त्याच वेळी चालकाने घाईगडबडीत बस पुढे नेली. यामुळे ईश्वरीचा तोल बिघडून ती खाली पडली आणि बसचे चाक तिच्या अंगावरून गेले. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Accident News :  स्कूल बसमधून पडली, चाकाखाली चिरडून ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
Gold Rate Today : सोन्याच्या दरात भूकंप, प्रति तोळा तब्बल इतक्या रूपयांची वाढ, वाचा 24k, 22k सोन्याचे ताजे दर

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दुर्घटनेस्थळावर पंचनामा केल्यानंतर मुलीचा मृतदेह चांदूर बाजार येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Accident News :  स्कूल बसमधून पडली, चाकाखाली चिरडून ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
Maharashtra Weather : ताशी ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा! 'या' जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट

या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, अमरावती पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिरखेड पोलीस स्टेशन आणि चांदूर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com