Maharashtra Weather : ताशी ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा! 'या' जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra weather update : महाराष्ट्रात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra weather update
Maharashtra weather updateSaam TV (AI image)
Published On

Maharashtra weather forecast IMD yellow : महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ४ दिवस उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकटाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह नाशिक जिल्ह्यात ढगाळ हवामान राहील, तसेच तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने (IMD) पुढील ४ दिवसांसाठी विविध जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला आहे. ९ ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर १० ऑगस्ट रोजी विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, ११ आणि १२ ऑगस्ट रोजी पावसाचा जोर ओसरणार असून कुठलाही मुख्य इशारा देण्यात आलेला नाही.

रविवारी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे (३०-४० किमी/तास) आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, गोंदिया, नागपूर या जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra weather update
EPFO New Rules: पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले! आता 'या' गोष्टीशिवाय क्लेम होणार रिजेक्ट; पाहा नवीन नियम

सोमवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra weather update
तुमचं मूल फेसबुक, इन्स्टा वापरतंय? सरकार आणतेय नवा कायदा; पालकांची परवानगी नसेल तर...

मंगळवारी आणि बुधवारी राज्यात पावसाचा जोर कमी होईल. हवामान विभागाने कोणत्याही जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केलेला नाही. पण राज्यात ढगाळ हवामान राहील असा अंदाज वर्तवला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी आणि सोमवारी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे येण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com