EPFO New Rules: पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले! आता 'या' गोष्टीशिवाय क्लेम होणार रिजेक्ट; पाहा नवीन नियम

EPFO new PF withdrawal rules 2026 explained : EPFO ने PF पैसे काढणे, क्लेम सेटलमेंट आणि E-Nomination संदर्भात महत्त्वाचे नियम बदलल्याचा दावा या माहितीत करण्यात आला आहे.
EPFO PF Withdrawal New Rules:
EPFO PF Withdrawal New Rules:साम टीव्ही मराठी
Published On

EPFO PF Withdrawal New Rules: नोकरदार वर्ग आणि 'ईपीएफओ' (EPFO) सदस्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (EPFO) पीएफ खात्यातून पैसे काढणे (PF Withdrawal), क्लेम सेटलमेंट आणि ई-नॉमिनेशन (E-Nomination) संदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. या नवीन नियमांनुसार, आता पीएफ क्लेम झटक्यात आणि सहज होण्यासाठी सदस्यांना काही तांत्रिक अटी पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. (New Rules for Epf Claim Settlement and Withdrawal)

जर पीएफ खात्यामध्ये तुमची माहिती अपडेट नसेल किंवा ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण झाली नसेल, तर तुमचा पीएफ क्लेम थेट फेटाळला (Reject) जाऊ शकतो. पीएफ काढताना होणारा उशीर, क्लेम रिजेक्शनचे वाढते प्रमाण आणि होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी प्रशासनाने ही नवीन नियमावली जारी केली आहे. त्यामुळे तुम्हीही पीएफचे पैसे काढण्याचा विचार करत असाल, तर हे नवीन नियम नेमके काय आहेत आणि त्याचा तुमच्या खात्यावर काय परिणाम होणार, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

EPFO PF Withdrawal New Rules:
तुमचं मूल फेसबुक, इन्स्टा वापरतंय? सरकार आणतेय नवा कायदा; पालकांची परवानगी नसेल तर...

कर्मचाऱ्याचा वाटा हा मूळ वेतनाच्या (Basic Salary) १२% पीएफ कापला जाईल. सध्या १५,००० रुपयांच्या मासिक वेतनावर पीएफची अनिवार्य अट लागू आहे. त्यानुसार जास्तीत जास्त १,८०० रुपये वैधानिक योगदान कापले जाते. १५,००० पेक्षा जास्त पगार असल्यास उर्वरित योगदान ऐच्छिक (Optional) असेल.

पूर्वी नियमावलीत थेट १५,००० रुपयांची मर्यादा नमूद होती. आता ही मर्यादा थेट केंद्र सरकारच्या अधिसूचनेशी (Notification) जोडली गेली आहे. यामुळे भविष्यात सरकारने पगाराची मर्यादा वाढवली, तर कायद्यात मोठे बदल न करता नियम सहज लागू करता येतील.

EPFO PF Withdrawal New Rules:
Housing Society Rule : सोसायटीच्या शेजारी दारूचे दुकान? महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; पाहा काय आहे नवीन नियम

पैसे काढण्याच्या अनेक गुंतागुंतीच्या श्रेणी रद्द करून आता फक्त ३ सोप्या श्रेणी तयार केल्या आहेत. त्यामध्ये अत्यावश्यक गरजा, कौटुंबिक गरजा आणि विशेष परिस्थिती याचा समवेश करण्यात आला आहे. त्यामुळे पैसे काढण्यासाठीचा अर्ज करणे आणि नियम समजून घेणे सोपे होईल.

सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील शिलकीपैकी जास्तीत जास्त ७५% पर्यंतच रक्कम अंशतः (Partial) काढता येईल. निवृत्तीनंतरच्या सुरक्षेसाठी किमान २५% रक्कम खात्यात शिल्लक ठेवणे बंधनकारक असेल.

EPFO PF Withdrawal New Rules:
Gold Rate Today : सोन्याच्या दरात भूकंप, प्रति तोळा तब्बल इतक्या रूपयांची वाढ, वाचा 24k, 22k सोन्याचे ताजे दर

पीएफमधून पैसे काढण्यासाठी किंवा वैद्यकीय (Medical) खर्चासाठी अर्ज करायचा असल्यास, आता किमान १२ महिने (१ वर्ष) नोकरी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांनी पीएफ निधी काढण्यापूर्वी आपली पात्रता आणि लागू अटी तपासाव्यात, कारण वेगवेगळ्या परिस्थितीत नियम बदलू शकतात.

नोकरी सोडल्यावर पूर्ण पीएफसाठी १२ महिने वाट पाहावी लागणार आहे, आधी नोकरी सोडल्यानंतर सलग २ महिने बेरोजगार राहिल्यास पूर्ण पीएफ काढता येत होता.पण आता पूर्ण पीएफ काढण्यासाठी १२ महिने बेरोजगार असणे आवश्यक आहे.

EPFO PF Withdrawal New Rules:
मोठी बातमी! भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या भावावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

पीएफ खात्याला वारसदार (Nominee) जोडण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे. कागदी अर्ज भरण्याची पद्धत टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली आहे. भविष्यात कुटुंबाला पेन्शन किंवा पीएफचे पैसे मिळण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून ई-नॉमिनेशन (E-Nomination) अनिवार्य आहे.

ईपीएफओला आता पीएफ क्लेम २० दिवसांच्या आत निकाली काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणतीही वैध माहिती नसताना दाव्यास उशीर झाल्यास, ईपीएफओला १२% दराने दंडात्मक व्याज द्यावे लागेल. ही दंडाची रक्कम संबंधित पीएफ आयुक्तांच्या (PF Commissioner) पगारातून वसूल केली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com