Bus Accident News : प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, ७ जणांचा जागीच मृत्यू; ११ प्रवासी गंभीर जखमी

Himachal Pradesh Bus Accident Update News : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात बैरागढजवळ खासगी बसचा भीषण अपघात झाला. दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू असून ११ प्रवासी जखमी झाले आहेत.
Himachal Pradesh Chamba Bus Accident: 7 Killed, 11 Injured
Himachal Pradesh Chamba Bus Accident: 7 Killed, 11 InjuredSaam Tv
Published On
Summary
  • हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात खासगी बसचा भीषण अपघात झाला

  • बैरागढजवळील चालूंज मोड येथे झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला

  • अपघातात ११ प्रवासी जखमी असून सहा जणांना रुग्णालयात हलवण्यात आले

  • प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरून पलटी झाली

Himachal Pradesh Chamba Bus Accident Update News हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात शनिवारी सकाळी भीषण बस अपघात झाला. चुराह विधानसभा मतदारसंघातील तीसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बैरागढजवळील चालूंज मोड येथे खासगी बसचा अपघात झाला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून ११ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांना पुढील उपचारांसाठी चंबा येथील पंडित जवाहरलाल नेहरू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी सकाळी सुमारे ७.१५ वाजता झाला. ही बस बैरागढहून चंबाच्या दिशेने जात होती. या दरम्यान चालूंज मोडजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरून पलटी होऊन दुसऱ्या रस्त्यावर जाऊन आदळल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Himachal Pradesh Chamba Bus Accident: 7 Killed, 11 Injured
SIR 2026 : सरकारचा मोठा निर्णय! SIR नोंदणीची कामे करणाऱ्या शिक्षक अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ; ERO, AERO ना मोठा दिलासा

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू करून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. चंबाचे पोलीस अधीक्षक विजय सकलानी यांनी अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे सांगितले.

Himachal Pradesh Chamba Bus Accident: 7 Killed, 11 Injured
Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

बचावकार्यात एनडीआरएफ, पोलीस, होमगार्ड, अग्निशमन दल आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. अपघातात मृत्यू झालेल्या सात जणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पोलीस अपघाताच्या कारणांचा तपास करत असून घटनास्थळावरून मिळणाऱ्या माहितीनुसार पुढील तपशील समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com