SIR 2026 : सरकारचा मोठा निर्णय! SIR नोंदणीची कामे करणाऱ्या शिक्षक अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ; ERO, AERO ना मोठा दिलासा

SIR 2026 Update News : SIR-2026 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय. नियमित EROना ३० हजार, AEROना २५ हजार वार्षिक मानधन.
Maharashtra Government Approves Annual Honorarium for EROs and AEROs Under SIR-2026
Maharashtra Government Approves Annual Honorarium for EROs and AEROs Under SIR-2026Saam Tv
Published On
Summary
  • महाराष्ट्र शासनाने नियमित ERO आणि AERO अधिकाऱ्यांना वार्षिक मानधन देण्यास मंजुरी दिली

  • ERO अधिकाऱ्यांना दरवर्षी ३० हजार रुपये, तर AERO अधिकाऱ्यांना २५ हजार रुपये मानधन मिळणार

  • ६ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय जारी

  • राज्यात २८८ ERO आणि १,७६२ AERO नियमितपणे कार्यरत आहेत

राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण म्हणजे SIR चे काम सुरू आहे. या SIRचे काम करणाऱ्या मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार नियमितपणे कार्यरत असलेल्या ERO आणि AERO यांना आता वार्षिक मानधन देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.

६ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, नियमित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना (ERO) दरवर्षी ३० हजार रुपये, तर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना (AERO) २५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. हे मानधन १ जुलै २०२६ पासून लागू करण्यात आले आहे. मतदार याद्या अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी ERO आणि AERO यांच्यावर असते. राज्यात सध्या २८८ ERO आणि १,७६२ AERO नियमितपणे कार्यरत आहेत.

Maharashtra Government Approves Annual Honorarium for EROs and AEROs Under SIR-2026
Healthy Lifestyle : जेवणानंतर पोट फुगतंय आणि गॅस होतोय? 'या' एका पाण्याने मिनिटांत मिळेल आराम

दरम्यान, SIR-2026 अंतर्गत मतदार याद्यांची विशेष सखोल पडताळणी सुरू आहे. या मोहिमेसाठी भारत निवडणूक आयोगाने नियमित पदांव्यतिरिक्त ३,५२७ अतिरिक्त AERO पदे अधिसूचित केली आहेत. या अतिरिक्त पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही त्यांच्या कार्यकाळापुरते मानधन देण्यात येणार आहे.

Maharashtra Government Approves Annual Honorarium for EROs and AEROs Under SIR-2026
Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

या निर्णयामुळे शिक्षक अधिकाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांच्या आधारे हा निर्णय घेतला असून, त्यामुळे SIR-2026 च्या कामात सहभागी अतिरिक्त AERO अधिकाऱ्यांनाही मानधनाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com