Alisha Khedekar
ओव्याचं पाणी पचन सुधारण्यास मदत करतात आणि गॅस, अपचन व पोटातील जडपणा कमी करण्यास उपयोगी ठरू शकतात.
बडीशेप पोट शांत ठेवण्यास मदत करते. जेवणानंतर होणारा गॅस कमी करण्यासाठी बडीशेपच पाणी पिल्यास त्रास कमी होऊ शकतो.
एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा बडीशेप उकळा, गाळून कोमट प्या.
जेवणानंतर 20 ते 30 मिनिटांनी हे कोमट पाणी पिणे अधिक सोयीचे ठरू शकते.
हे मिश्रण पचनक्रियेला आधार देऊन गॅस आणि पोटातील अस्वस्थता कमी करण्यास मदत करू शकते.
दिवसभर पुरेसे पाणी पिल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा धोका कमी होतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा