Alisha Khedekar
पुरेशी झोप घेतल्यानंतरही दिवसभर थकल्यासारखे वाटणे हे फॅटी लिव्हरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
पोटाच्या उजव्या वरच्या भागात जडपणा, अस्वस्थता किंवा हलक्या स्वरूपाच्या वेदना जाणवू शकतात.
अचानक भूक कमी लागणे, जेवणानंतर पोट भरल्यासारखे वाटणे किंवा मळमळ होणे दिसू शकते.
विशेषतः पोटाभोवती चरबी वाढणे आणि वजन नियंत्रणात न राहणे फॅटी लिव्हरशी संबंधित असू शकते.
गॅस, अपचन, पोट फुगणे किंवा वारंवार अस्वस्थ वाटणे याकडे दुर्लक्ष करू नका.
मधुमेह किंवा प्रीडायबेटिस असलेल्या व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हरचा धोका अधिक असतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा