Accident News : पुण्यात दहीहंडीसाठी निघालेल्या गोविंदाचा मृत्यू, परिसरात हळहळ

Pune Accident News : पुण्यात २२ वर्षीय गोविंदा गौरव चव्हाणचा सासवड-दिवेघाट परिसरात एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाला. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
Pune Accident News
Pune Accident News Saam tv
Published On
Summary
  • सासवड-दिवेघाट परिसरात एसटी बस आणि दुचाकीची धडक

  • दहीहंडी फोडण्यासाठी पुण्याच्या दिशेने निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

  • अन्य दोन तरुण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

  • एसटी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल

सचिन जाधव, पुणे

राज्यभरात सगळीकडे दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. सगळीकडे जल्लोषाचं वातावरण असताना पुण्यात एका गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारी रात्री सासवड-दिवेघाट परिसरात हा भीषण अपघात घडला. एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव राजेंद्र चव्हाण (वय २२) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुण गोविंदाचे नाव आहे. गौरव हा आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून पुण्यात दहीहंडी फोडण्यासाठी निघाला होता. मात्र, पुण्याच्या दिशेने जात असताना सासवड-दिवेघाट परिसरात त्यांच्या दुचाकीला एसटी महामंडळाच्या बसने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, गौरव याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Pune Accident News
Kidney Stone : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? ३० दिवस आधी दिसतील 'ही' लक्षणे, दुर्लक्ष कराल तर....

या अपघातात गौरवसोबत असलेले इतर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत गौरवचा मित्र ऋषिकेश खरात (वय २१) यांनी याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार एसटी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Accident News
Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय आता ६२, महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये नियम बदलणार

दहीहंडी उत्सवासाठी मोठ्या उत्साहाने पुण्याच्या दिशेने निघालेल्या तरुणांवर काळाने घाला घातल्याने बारामती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गौरवच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, अपघातावेळी बसचा वेग किती होता, या या प्रकरणाचा अधिक तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com