Alisha Khedekar
कंबरेच्या एका बाजूला अचानक तीव्र वेदना सुरू होतात आणि वेदना पोटाच्या खालच्या भागाकडेही जाणवू शकतात.
किडनी स्टोनमुळे लघवीच्या मार्गाला इजा होऊ शकते, त्यामुळे लघवी गुलाबी, लाल किंवा तपकिरी दिसू शकते.
स्टोन खाली सरकल्यावर लघवी करताना जळजळ, चुरचुर किंवा तीव्र वेदना जाणवण्याची शक्यता असते.
वारंवार लघवीला लागणे किंवा थोडी थोडी लघवी होणे हेही किडनी स्टोनचे संभाव्य लक्षण असू शकते.
स्टोन लघवीच्या मार्गात अडकल्यास लघवी सुरू होण्यास त्रास होतो किंवा लघवी पूर्णपणे थांबू शकते.
स्टोनच्या हालचालीमुळे पोटाच्या खालच्या भागात किंवा जांघेजवळ अचानक दुखणे आणि कळ येणे जाणवू शकते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा