पहलगामनंतर सीमापार गेला, पूर्णम कुमार आज भारतात परतला, पाकिस्तानने पुन्हा गुडघे टेकले

Poornam Kumar BSF return : पहलगाम हल्ल्यानंतर चुकून पाकिस्तानात गेलेले BSF जवान पूर्णम कुमार यांची आज भारतात सुखरूप परतफेड झाली. पाकिस्तानने भारताच्या दबावामुळे त्यांना सोडले. कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला.
Poornam Kumar Back in India
Poornam Kumar Back in India – Pakistan Folds After Diplomatic Pressure
Published On

BSF soldier Poornam Kumar BSF return : बीएसएफ जवान पूर्णम कुमार अनावधानाने पाकिस्तानच्या सीमेत पोहचला होता. त्याला पाकिस्तानी रेजंर्सनी ताब्यात घेतले होते. २३ तारखेपासून पूर्णम पाकिस्तानच्या ताब्यात होते. भारतापुढे पुन्हा एकदा गुडघे टेकवत पाकिस्तानला पूर्णम यांना परत पाठवावे लागले. आज पाकिस्तानी रेंजर्सनी पूर्णम कुमार यांना भारताच्या ताब्यात दिले. त्यांच्या सुटकेनंतर भारतात त्यांचे स्वागत झाले. पूर्णम कुमार यांच्या कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या सुरक्षित परतण्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

२२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ला झाला होता. सीमेवर कार्यरत असणारा पूर्णम कुमार हा २३ एप्रिल रोजी अनावधानाने पाकिस्तानमध्ये पोहचला होता. दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यामुळे भारताने आक्रम भूमिका घेतली. दहशतवादाविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानात जाऊन ९ दहशतवादी तळ नष्ट केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध जास्तच ताणले गेले. त्यामुळे पूर्णम भारतात परत येणार का? अशी काळजी त्याच्या कुटुंबियाला होती. पण अखेर पाकिस्तान भारतापुढे झुकला असून पूर्णमला परत पाठवले आहे.

Poornam Kumar Back in India
Pune Crime : ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंड पाठ सोडेना, IT तील गर्लफ्रेंडला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

पाकिस्तानने बुधवारी बीएसएफ जवान पूर्णम कुमार साहू यांना भारताच्या ताब्यात दिले. 23 एप्रिल रोजी त्यांना पकडण्यात आले होते. पंजाबमधील अटारी-वाघा सीमेवर सकाळी 10:30 वाजता पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना बीएसएफच्या हवाली केले. ही प्रक्रिया शांततेने आणि स्थापित प्रोटोकॉलनुसार पार पडली, असे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com