मंत्री, खासदार, आमदारांचे तातडीने सर्व दौरे रद्द; भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर

BJP Youth Leader Ankit Agarwal Accident Death In Agra: आग्रा येथे भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या भाजप युवा मोर्चाचे नेते अंकित अग्रवाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून, लोकप्रतिनिधींनी दौरे रद्द करून कुटुंबीयांची भेट घेतली.
BJP youth leader Ankit Agarwal, who succumbed to injuries after a tragic road accident in Agra.
BJP youth leader Ankit Agarwal, who succumbed to injuries after a tragic road accident in Agra.saam tv
Published On

आग्रा येथील ताजगंज परिसरात ५ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले भाजप युवा मोर्चाचे स्थानिक नेते अंकित अग्रवाल यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. रविवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, ज्या शाळेच्या बसने हा अपघात झाला होता, त्या शाळा व्यवस्थापनाने मृत अंकित यांच्या चार वर्षीय मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.

BJP youth leader Ankit Agarwal, who succumbed to injuries after a tragic road accident in Agra.
Thalapathy Vijay CM oath : राजकारणात नवा ट्विस्ट! थलापती विजय यांचा शपथविधी रखडला; 'मॅजिक फिगर'साठी अजून २ आमदारांच्या पाठिंब्याची गरज

मिळालेल्या माहितीनुसार, कटरा जोगी दास येथील रहिवासी आणि चांदीचे व्यापारी असलेले अंकित अग्रवाल (भाजप युवा मोर्चा ताज मंडलचे मंत्री) हे ५ मे रोजी सकाळी मनकामेश्वर आणि खाटूश्याम मंदिरात दर्शन घेऊन स्कूटीवरून घरी परतत होते. मंडी परिसरात 'प्रिल्यूड पब्लिक स्कूल'च्या बसने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लायर्स कॉलनीतील एका खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते.

BJP youth leader Ankit Agarwal, who succumbed to injuries after a tragic road accident in Agra.
LPG New Rules : ...तर तुमचं LPG कनेक्शन होईल बंद; सरकारचे नवे नियम लागू, हे महत्वाचं काम झटपट कराच

कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

अंकित अग्रवाल यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर आजीविका चालवण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शिखा, वृद्ध आई आणि एक ४ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने नातेवाईकांचा आक्रोश हृदयद्रावक होता. याप्रकरणी अंकित यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून शाळा संचालक सुशील गुप्ता, मुख्याध्यापक अरविंद श्रीवास्तव आणि अज्ञात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीपी ताज सुरक्षा मयंक तिवारी यांनी मृतकाच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले असून, पोलिसांनी रात्रीच मृतदेहाचे शवविच्छेदन करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे.

BJP youth leader Ankit Agarwal, who succumbed to injuries after a tragic road accident in Agra.
पंतप्रधान मोदी म्हणाले सोनं खरेदी करू नका, राहुल गांधी भडकले; म्हणाले आता देश चालवणे...

अपघातानंतर प्रिल्यूड पब्लिक स्कूलचे संचालक सुशील गुप्ता यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जाहीर केले की, अंकित यांच्या ४ वर्षीय मुलीला प्रिल्यूड पब्लिक स्कूलमध्ये मोफत शिक्षण दिले जाईल. तसेच त्यांच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत केली जाईल.

लोकप्रतिनिधींचे नियोजित दौरे रद्द

त्यांच्या निधनाची बातमी समजताच आग्र्याचे पालकमंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधी खासदार, आमदारांनी दौरे रद्द करून अंकित यांच्या घरी पोहोचले आहे. तसेच उत्तरप्रदेशच्या अनेक मंत्र्यांनी एक्सवर पोस्ट करत अंकित अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com