SSC Exam: मुख्याध्यापक पद खुपत होतं, शाळेतूनच रचला डाव; भूगोलाच्या पेपर चोरीची A to Z स्टोरी आली समोर

SSC geography paper theft case in Sangola Solapur: सोलापूरातील सांगोल्यामधील एका शाळेतून दहावीच्या भूगोल विषयाच्या ५० प्रश्नपत्रिकांची चोरी झाली होती. या प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर आले आहे.
SSC Exam: मुख्याध्यापक पद खुपत होतं, शाळेतूनच रचला डाव; भूगोलाच्या पेपर चोरीची A to Z स्टोरी आली समोर
Solapur Exam Paper Stolen CaseSaam Tv
Published On

Summary -

  • सांगोल्यात दहावीचा भूगोल पेपर चोरी प्रकरणामागचं कारण उघड

  • स्ट्राँग रूम फोडून ५० प्रश्नपत्रिका चोरी केल्या

  • मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

  • शाळेतील अंतर्गत वादामुळे कट रचल्याचा संशय

अक्षय बडवे, पुणे

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील परीक्षा केंद्रासाठी असणाऱ्या दहावीच्या प्रश्नपत्रिका सांगोला विद्यामंदिर प्रशाला या ठिकाणी बोर्ड कस्टडीमध्ये सुरक्षित ठेवल्या होत्या. पण सोमवारी रात्री चोरट्यांनी भूगोलाचे पेपरचे ५० गठ्ठे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने या घटनेची दखल घेत शाळेचे मुख्याध्यापक, गट शिक्षण अधिकारी आणि यांना निलंबित केले. शाळेत सुरू असलेल्या अंतर्गत कलहामुळे शाळेतच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. ही सगळी घटना सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे घडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दखल घेतली आणि विभागीय अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी मंगळवारी थेट सांगोला गाठलं आणि कार्यवाही सुरू केली. दुसऱ्या बाजूला, सोलापूर पोलिसांकडून सुद्धा या प्रकरणात लक्ष घातले आणि कारवाई सुरू केली. सोलापूर जिल्ह्याच्या सांगोल्यात दहावीच्या परीक्षेदरम्यान भूगोलाचे ५० पेपर चोरीला गेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या संपूर्ण घटनेचा अहवाल पुणे बोर्डाने मागितला आणि आता कारवाईला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज नियोजित केलेला भूगोलाचा पेपर सुरळीत पार पडल्याची माहिती बोर्डाने दिली आहे.

SSC Exam: मुख्याध्यापक पद खुपत होतं, शाळेतूनच रचला डाव; भूगोलाच्या पेपर चोरीची A to Z स्टोरी आली समोर
SSC Exam : दहावीचा पेपर सुरू असताना शिक्षकांमध्येच राडा; गुरूजी गंभीर जखमी, नेमकं काय झालं?

कुलूप तोडलं, पेटी उघडली आणि पेपर गायब

दहावीच्या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या प्रश्नपत्रिका सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची अत्यंत सुरक्षित मानली जाणारी 'स्ट्राँग रूम' फोडली आणि पेपर गायब झाले. हा सगळा प्रकार एका तरुणाने केला असल्याचे आता सीसीटिव्हीमधून स्पष्ट झालं आहे. एका तरुणाने आत प्रवेश केला आणि भूगोलाचे मराठी भाषेतून तयार असलेल्या प्रश्नपत्रिकेची पेटी उघडली आणि ५० पत्रिका चोरून त्याने तिथून पळ काढला. या खोलीतील सीसीटिव्ही जरी बंद असले तरी सुद्धा बाहेरील सीसीटिव्ही आणि परिसरातील इतर कॅमेराची पाहणी केल्यानंतर हे कृत्य समोर आलं. सकाळी जेव्हा केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली तेव्हा सगळ्यांची झोप उडाली.

SSC Exam: मुख्याध्यापक पद खुपत होतं, शाळेतूनच रचला डाव; भूगोलाच्या पेपर चोरीची A to Z स्टोरी आली समोर
SSC Exam: बीडमध्ये दहावीचा पेपर फुटला! उत्तरपत्रिका थेट शिक्षकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर

मुख्याध्यापक पद खुपत असल्याने शाळेतूनच डाव रचला

या प्रकरणी शिक्षण मंडळाकडून तसेच पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सांगोला येथील विद्यामंदिर प्रशालेमध्ये असलेल्या काही जणांनी हे कृत्य केल्याचा संशय निर्माण झाला आहे. आजही अनेक शाळांमध्ये ज्येष्ठ शिक्षक आणि ज्युनिअर, तरुण शिक्षकांमध्ये चढाओढ पाहायला मिळते. तसाच काहीसा प्रकार इथे घडल्याचा संशय तपास करणाऱ्यांना आहे. शाळेतील सर्वोच्च पद हे मुख्याध्यापक आणि ते मिळवण्यासाठी अनेकांचे कठोर परिश्रम असतात.

याप्रकरणी ३५ वर्षीय मुख्याध्यापक यांच्यावर शाळेतील काही व्यक्तींचा डोळा होता तसेच इर्ष्याची एक झुळूक पसरत होती आणि त्यातूनच हे कृत्य घडलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकदा हा चोर मिळून आला आणि त्याकडे चौकशी केली की नेमका या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे आणि त्याने हे कृत्य का केलं आणि यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला आहे का हे समोर येईल.

SSC Exam: मुख्याध्यापक पद खुपत होतं, शाळेतूनच रचला डाव; भूगोलाच्या पेपर चोरीची A to Z स्टोरी आली समोर
SSC Exam : बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा मिशनचा फज्जा, दहावीचा पेपर ३ दिवस आधीच फोडला

मुख्याधपक, गट शिक्षणाधिकारी निलंबित

दहावीच्या स्ट्राँग रूमसारख्या ठिकाणी ही चोरी झाल्याने शिक्षण मंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. शाळेची संपूर्ण जबाबदारी ही शाळेचे केंद्र प्रमुख म्हणेजच मुख्याधपक यांच्यावर असते. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने याबाबत पहिली कारवाई मुख्याधपक यांच्यावर करण्यात आली आहे. सांगोला येथील बोर्डाचे पेपर चोरीप्रकरणी प्रभारी शिक्षणाधिकारी सुयोग नवले, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांच्यावर शिक्षण विभागाने निलंबित केलं आहे. तसेच परीक्षा केंद्रावर तैनात आलेल्या होमगार्ड आणि पोलिस कर्मचारी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी लवकरच पोलिस विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

SSC Exam: मुख्याध्यापक पद खुपत होतं, शाळेतूनच रचला डाव; भूगोलाच्या पेपर चोरीची A to Z स्टोरी आली समोर
SSC Exam: शिक्षण क्षेत्रात खळबळ, परीक्षेच्या आदल्या दिवशी भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरीला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com