दहावी पेपरफुटीचा बनाव; टेलिग्रामवर चालायचा पैशांचा व्यवहार

Pune SSC Exam Paper Leak Scam On Telegram: पुण्यात दहावीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा बनाव करून विद्यार्थ्यांकडून ६०० रुपये उकळणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. टेलिग्राम ग्रुपवर बनावट पीडीएफ शेअर करून विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात येत होती.
Pune Police arrested an 18-year-old youth for allegedly cheating students by claiming to sell leaked SSC exam papers through a Telegram group.
Pune Police arrested an 18-year-old youth for allegedly cheating students by claiming to sell leaked SSC exam papers through a Telegram group.AI
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे: दहावीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा बनाव करून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात प्रत्यक्षात कोणतीही पेपरफुटी झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी चैतन्य विनोद शेंडे (वय १८) हा मूळचा चंद्रपूरचा असून तो टेलिग्राम प्लॅटफॉर्मचा वापर करून विद्यार्थ्यांची फसवणूक करत होता.

Pune Police arrested an 18-year-old youth for allegedly cheating students by claiming to sell leaked SSC exam papers through a Telegram group.
LPG Cylinder: वेळीच व्हा सावध! गॅस बुकिंगच्या नावाखाली बँक अकाऊंट होतंय रिकामं; या चूका टाळा

काही विद्यार्थी पैसे पाठवताच आरोपी त्यांना तात्काळ ब्लॉक करत असे. विशेष म्हणजे टेलिग्रामवरील फाईलमध्ये नंतर मजकूर बदलण्याची युक्ती वापरून तो परीक्षेनंतर खरी प्रश्नपत्रिका त्या पीडीएफमध्ये अपलोड करत असे. त्यामुळे आधीच पेपर मिळाल्याचा भास निर्माण होत होता.

Pune Police arrested an 18-year-old youth for allegedly cheating students by claiming to sell leaked SSC exam papers through a Telegram group.
Iran Israel War : इराणकडून तेलाच्या जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; १५ जण बचावले

त्यानंतर तक्रारीमध्ये नमूद केल्याने ग्रुप वरती संदेश पोस्ट करत असेल आणि आपण परीक्षेची प्रश्नपत्रिका 600 रुपयेमध्ये देऊ शकतो असा दावा करत होता. पीडित विद्यार्थ्यांकडून पैसे प्राप्त होताच त्यांना त्वरित ब्लॉक करत असे. प्रत्यक्ष परीक्षा संपल्यानंतर तो परीक्षेची खरी प्रश्नपत्रिका काय होत असे आणि त्यांनी अधिक अपलोड केलेल्या फाईल बद्दल त्या जागी खरी प्रश्नपत्रिका अपलोड करत असे.

Pune Police arrested an 18-year-old youth for allegedly cheating students by claiming to sell leaked SSC exam papers through a Telegram group.
Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी सुरु होणार? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून पेपरफुटी झालेली नसल्याचे स्पष्ट केले असून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणालाही पैसे पाठवू नयेत, असे आवाहन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने आमच्याकडे तक्रार दिली. त्यावरून आम्ही शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला होता. एक महाराष्ट्र स्टेट बोर्ड असा टेलिग्राम ग्रूप केला होता. या ग्रुपवर पेपर मागणी केली. त्यावर PDF फाईल होती. त्यात त्याने गणित पेपर असल्याचे भासवले, QR कोडद्वारे पैसे घेतले जायचे. ६०० रुपये एका पेपर मागे घ्यायचा व्यवहार झाल्यानंतर त्याला ब्लॉक करून टाकायचा. तसेच दहावीचा गणित पेपर फुटला नव्हता. त्याने फक्त भासवले होते, त्या ग्रुपमध्ये २४५ मेंबर होते. खबरदारी म्हणून टेलिग्राम चॅनेल ब्लॉक केला आहे. आरोपी सोबत फ्रॉड झाला होता. असेच दुसऱ्या सोबत करत होता. त्याच्या सोबत बारावी परीक्षेवेळी घडले होते. आरोपी आता नर्सिंग पहिल्या वर्षीचे शिक्षण घेत आहेत. या टोळीने कितीजणांना फसवले, किती पैसे कमावले. याबाबत पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com