Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी सुरु होणार? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Mumbai Ahmedabad Bullet Train Start Date: मुंबई अहमदाबात बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आला आहे. आता सुरत ते वापी मार्ग ऑगस्ट २०२७ पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे.
Mumbai-Ahmedabad Bullet Train
Mumbai-Ahmedabad Bullet TrainSaam Tv
Published On
Summary

मुंबई-अहमदाबात बुलेट ट्रेनबाबत अपडेट

सुरत ते वापी मार्ग ऑगस्ट २०२७ करण्याची शक्यता

काम लवकरच होणार

देशातील सर्वात वेगवान ट्रेन लवकरच सुरु होणार आहे. बुलेट ट्रेनचे काम अधिक वेगाने सुरु आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन पहिल्या टप्प्यात B28 चालवणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२७ मध्ये सुरु होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने संसदीय समितीला माहिती दिली आहे. राष्ट्रीय वाहतूक कंपनीने सूरत ते वापी या मार्गावर BEML-निर्मित ट्रेनसेट्स वापरुन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मार्ग ९७ किमी लांब असणार आहे.

रेल्वेचा संसदीय स्थायी समितीचा अहवाल मंगळवारी संसदेत मांडण्यात आला. यामध्ये मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्प कधी पूर्ण होणार याबाबत माहिती दिली आहे.

Mumbai-Ahmedabad Bullet Train
New Vande Bharat Express : नव्या वंदे एक्सप्रेसची घोषणा; कुठून कुठे धावणार? वाचा वेळापत्रक

बुलेट ट्रेनच्या अहवालात काय म्हटलंय?

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुलेट ट्रेन हा गुंतागुंतीचा आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प आहे. यामध्ये जपान आणि इतर देशांसोबत पार्टनरशिप आणि खरेदी पुरवठ्याचा समावेश आहे. शिंकानसेनची E10 मालिका ही जपानमध्ये तयार केली जात आहे. दरम्यान आता B28 वापरुन काम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या बुलेट ट्रेनच्या पर्यायी सिग्न सिस्टीमसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत त्याआधीच काम सुरु झाले आबे. सध्या B28 बंगळुरुच्या बीईएमएल येथे तयार केले जात आहे. प्रकल्पाची सुरुवात सिव्हिल स्ट्रक्चर, ट्रॅक, इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनसंबंधित सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर आणि ट्रेनसेट्सच्या डिलिव्हरीनंतर निश्चित केली जाऊ शकते.

ऑगस्ट २०२७ मध्ये सुरत ते वापी ९७ किमी मार्गावर बुलेट ट्रेन सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, याचसोबत बुलेट ट्रेनचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. हा खर्च टाळण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात यावर प्रकाश टाकला आहे.

Mumbai-Ahmedabad Bullet Train
Vande Bharat Express: मुंबईहून सुटणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेसचं वेळापत्रक बदललं, आता आणखी ३० मिनिटे वाचणार

बुलेट ट्रेनचा खर्च

बुलेट ट्रेनसाठी ९७,६३६ कोटी रुपयांची तरतूद केली होती. २०१५ मध्ये याची घोषणा झाली होती. भविष्यात हा खर्च अजून वाढण्याची शक्यता आहे. उत्पादनाच्या आर्थिक घटकांमध्ये वाढ झाल्याने या प्रकल्पात १९,०८४ कोटींची वाढ झाली आहे. भूसंपादन, पुनर्वसन यासाठीचा खर्च वाढला आहे.

Mumbai-Ahmedabad Bullet Train
Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; पालघरमधील ४५४ मीटर लांबीच्या टनेलचे काम पूर्ण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com