PAT Exam Paper: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! परीक्षेआधीच पेपर फुटला, प्रश्नपत्रिका युट्यूब चॅनेलवर व्हायरल

PAT Exam paper Leak: अहमदनगरमध्ये आज परिक्षेआधीच पॅटचा इंग्रजी विषयाचा पेपर फुटला. इंग्रजीच्या पेपरची प्रश्नपत्रिका युट्यूब चॅनेलवर व्हायरल झाली आहे. याप्रकरणी युट्यूब चॅनेल मालकांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
PAT Exam Paper: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! परीक्षेआधीच पेपर फुटला, प्रश्नपत्रिका युट्यूब चॅनेलवर व्हायरल
PAT Exam paper LeakSaam TV
Published On

सुशिल थोरात, अहिल्यानगर

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 'PAT' अर्थात संकलित मूल्यमापन परीक्षेचे पेपर परीक्षेपूर्वीच अनेक युट्यूब चॅनलवर उत्तरांसह फूटल्याचा प्रकार समोर आला होता. यासंदर्भात पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र असं असताना देखील आज होणाऱ्या इंग्रजीच्या पेपरची प्रश्नपत्रिका ही पुन्हा एकदा फुटली असल्याच समोर आला आहे.

इंग्रजीच्या पेपरची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे खळबळ उडाली आहे. जवळपास २५ हून अधिक यूट्यूब चॅनलवर अशा पद्धतीने हे पेपर उत्तरांसह प्रसारित करण्यात आल्याचे अहिल्यानगर शहरातील पालक सचिन काळे यांनी सांगितले आहे. याबाबत काळे यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित यूट्यूब चॅनल चालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

PAT Exam Paper: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! परीक्षेआधीच पेपर फुटला, प्रश्नपत्रिका युट्यूब चॅनेलवर व्हायरल
Ahmednagar Politics: शिर्डी सोडली की माझं ग्रहमान बदलतं, थोरातांवर टीका करताना सुजय विखे असं का म्हणाले?

याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन देखील परीक्षापूर्वीच अशा पद्धतीने यूट्यूब चॅनलवर पेपर आल्याने हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचे एका विद्यार्थ्याचे पालक सचिन काळे यांनी म्हटलं आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने इयत्ता पहिली ते नववीपर्यंत ही परीक्षा घेतली जाते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते.

PAT Exam Paper: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! परीक्षेआधीच पेपर फुटला, प्रश्नपत्रिका युट्यूब चॅनेलवर व्हायरल
Ahmednagar: शिर्डीजवळ २० एकरात उभी राहतेय श्रीराम सृष्टी; पीएचडी मार्गदर्शन केंद्रासह रामायण रिचर्स सेंटरची होणार उभारणी

PAT परीक्षेची प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांकडून तयारी करून घेतली जाते. मात्र परीक्षेच्या आधीच संपूर्ण प्रश्नपत्रिका ही जर यूट्यूब चॅनलवर येत असेल तर हे गंभीर असल्याचे सचिन काळे यांनी म्हटलं आहे. तसंच, संबंधित युट्युब चॅनेल चालकांवर अटकेची कारवाई करण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे. परीक्षेपूर्वीच पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

PAT Exam Paper: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! परीक्षेआधीच पेपर फुटला, प्रश्नपत्रिका युट्यूब चॅनेलवर व्हायरल
Ahmednagar News: परीक्षा केंद्रावर पोहचला नायब तहसीलदार, मुलाला कॉपी पुरवताना रंगेहाथ पकडले, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com