Shirdi News : इस्रोचा माजी अधिकारी शिर्डीत मागतोय भीक? फाडफाड इंग्रजी बोलतोय, चांद्रयान मोहिमेत काम केल्याचा दावा

Shirdi Police Detain Beggars : इस्रोचा माजी अधिकारी शिर्डीत भीक मागतोय. यावर विश्वास बसत नाही ना? इस्रोमध्ये चांद्रयान मोहिमेत काम केल्याचा दावाही त्याने केला आहे. पण यामागची कहाणी काही वेगळीच आहे.
इस्रोचा माजी अधिकारी शिर्डीत मागतोय भीक?
Shirdi Beggers caught by Policesaam tv
Published On

सचिन बनसोडे, शिर्डी / अहिल्यानगर

शिर्डीतील भिकारी धरपकड मोहीमेत ५० पेक्षा अधिक भिकारी ताब्यात घेण्यात आले आहेत. यात काही जण इंग्रजी बोलत पैसे मागत असल्याचं दिसून आलं आहे. मात्र या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एका जणाने आपण इस्त्रोमधील माजी अधिकारी असल्याचा दावा केलाय. त्या व्यक्तीला फाडफाड इंग्रजी बोलताना बघून पोलीसही अवाक झाले. याशिवाय आपण इस्रोमध्ये चांद्रयान मोहिमेत काम केल्याचा दावाही त्यानं केला आहे.

साईबाबांच्या शिर्डीत भाविकांची नेहमीच गर्दी असते. अशा वेळी अगदी सहज उपजीविका आणि उदार्निवाह होत असल्यानं विविध राज्यातील भिकारी येथे आपलं बस्तान मांडतात. शिर्डी पोलीस, साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषदेच्या वतीने महत्वाच्या सण-उत्सव काळात भिकाऱ्यांची धरपकड मोहीम राबविली जाते. कायदेशीर प्रक्रिया करून यापैकी पुरूष भिकाऱ्यांची रवानगी विसापूर येथील भिक्षेकरीगृहात, तर महिला भिकाऱ्यांची रवानगी चेंबूर येथील भिक्षेकरीगृहात केली जाते. नुकत्याच राबवलेल्या मोहिमेत जवळपास ५० भिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

शिर्डीतून ताब्यात घेण्यात आलेल्या भिक्षेकऱ्यांमध्ये काहीजण उच्चशिक्षित असल्याची उदाहरणे देखील समोर येतात. असाच काहीसा प्रकार नुकत्याच राबवण्यात आलेल्या कारवाई दरम्यान समोर आलाय. साईभक्तांकडून पैसे मागणाऱ्या ६० वर्षीय के. एस. नारायण नामक एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असता त्याने आपण इस्रोत काम केल्याचा दावा केला आहे.

२००८ साली स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर नियमित शिर्डीला येतो; मात्र यावेळी नाशिकमध्ये माझे पैसे चोरीला गेल्याने शिर्डीत पैसे मागत असल्याचे त्याने सांगितले. याबाबत शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी माहिती दिली.

इस्रोचा माजी अधिकारी शिर्डीत मागतोय भीक?
Shirdi News: साई चरणी तब्बल 4 कोटी 26 लाखांचं दान|VIDEO

के. एस. नारायण याने केलेल्या दाव्याबाबत पोलिसांनी पुष्टी केली नसली तरी त्याचे इंग्रजीतील संभाषण ऐकून पोलिसही अवाक झाले आहेत. के. एस. नारायण यांच्याकडून लेखी लिहून घेतल्यानंतर पुन्हा असे कृत्य न करण्याच्या अटीवर पोलिसांनी त्याला सोडून दिले आहे. मात्र के. एस. नारायण याने इस्रोमध्ये काम केल्याचा दावा केल्याने हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.

इस्रोचा माजी अधिकारी शिर्डीत मागतोय भीक?
Ahilyanagar Water Crisis : मार्च महिन्यातच पाण्यासाठी भटकंती; अहिल्यानगर तालुक्यातील १२ गावातील भीषण वास्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com