Ahmednagar News: परीक्षा केंद्रावर पोहचला नायब तहसीलदार, मुलाला कॉपी पुरवताना रंगेहाथ पकडले, VIDEO व्हायरल

Deputy Tehsildar Caught Red Handed Supplying Cheats: नायब तहसीलदार अनिल तोडमल यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी देताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आपल्या मुलालाच कॉपी पुरवण्यासाठी ते परीक्षा केंद्रावर गेले होते.

बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदाराला कॉफी पुरवताना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे कॉपी पुरवतानाचा नायब तहसीलदाराचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नायब तहसीलदार अनिल तोडमल यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी देताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. बारावी पेपरमध्ये स्वतःच्याच मुलाला नायब तहसीलदार कॉपी पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित नायब तहसीलदारावर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com