संजय सूर्यवंशी
नांदेड : नांदेडच्या तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहत असल्याचा प्रकार सुरु आहे. यामुळे नागरिकांची कामे होत नसून या विरोधात महिलांनी आंदोलन केले. या महिला आंदोलकांनी तहसीलदारांच्या खुर्चीसह तहसील कार्यालयाचा ताबा घेतला आहे.
नांदेडच्या (Nanded) तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी गैरहजर असल्याने आपल्या न्याय हक्क मागणीसाठी आलेल्या महिला आंदोलकांनी चक्क तहसीलदार यांच्या खुर्चीचा ताबा घेतला. नांदेडच्या हिमायतनगर तहसिल कार्यालयातील हा प्रकार आहे. या आंदोलकांमधली एक महिला तहसीलदार यांच्या खुर्चीवर जाऊन बसली. त्यासोबतच इतर अधिकारी आणि कर्मचारी नसलेल्या खुर्च्यांवर इतर महिला आंदोलक जाऊन बसल्या.
प्रहार संघटनेतर्फे आज हिमायतनगर तहसिल कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. वृद्ध, निराधार महिलांनी आपल्या मागण्यासाठी नांदेडच्या हिमायतनगर तहसिल कार्यालयावर मोर्चा नेला असता तहसिल कार्यालयात तहसीलदार आणि अधिकारी कर्मचारी गैरहजर असल्याने तहसीलदार यांच्या खुर्चीसह तहसिल कार्यालयावर या महिला आंदोलकांनी ताबा घेतला होता. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.