'माझे ग्रहमान फिरलेले आहेत. मला बाहेर प्रचाराला बोलवू नका.' असे वक्तव्य करणारे माजी खासदार सुजय विखे आपल्या वडिलांसाठी मात्र शिर्डी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. शिर्डी मतदारसंघात माझे ग्रहमान सुस्थितीत राहतात. मात्र 'शिर्डी सोडली की माझे ग्रहमान बदलतात. त्यामुळे मी सध्या शिर्डी मतदारसंघातच थांबून आहे.' असे मिश्किल वक्तव्य पुन्हा एकदा सुजय विखे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मतदारसंघात विखे पाटलांची दहशत असल्याचा आरोप म्हणजे विरोधकांनी केलेला सर्वात मोठा जोक आहे. विरोधकांच्या सभेत जामर लावायला ते काही प्रधानमंत्री किंवा गृहमंत्री नाहीत. त्यांच्या जनरेटरला संगमनेरहून डिझेल न आल्याने सभेच्यावेळी त्यांची लाईट जाते.
जामर लागले हे १०० टक्के खरे आहे. पण ते विरोधकांच्या डोक्याला लागले आहेत. मी संगमनेरमध्ये चार सभा घेतल्या त्यामुळे ते जाम झाले आहेत असा टोला सुजय विखे यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना लगावला आहे.
तसचं, 'आमच्या विरोधात शरद पवार सभा घ्यायला येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र हा सगळा फुगा असून शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनता नेहमीच विखे पाटील परिवारासोबत असल्याचे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.' सध्या अहमदनगरमध्ये विखे पाटील कुटुंबीय आणि थोरात कुटुंबीयांमधील आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिल सुरूच आहे. दोन्ही कुटुंबीयांकडून प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप केले जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.