Maharashtra Assembly election 2024: विधानसभा निवडणूक ऐन रंगात आली आहे, प्रचाराचा धुरळा उडालाय. महायुती आणि मविआ यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात महायुतीवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यात भाजपला जोरदार धक्का दिलाय. भाजपच्या माजी आमदाराने ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दक्षिण सोलापूरचे माजी आमदार बिराजदार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. सोलापूर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण बिराजदार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. - पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोलापुरात पक्षप्रवेश झाला. भाजप आमदार सुभाष देशमुख यांना हा मोठा धक्का मानला जातोय. शिवशरण बिराजदार पाटील हे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत. दक्षिण सोलापूरमध्ये लिंगायत समाजाचे मोठे प्राबल्य आहे. ऐन विधानसभेला शिवशरण बिराजदार पाटील यांनी साथ सोडल्याचा भाजपला मोठा धक्का बसू शकतो.
शिवशरण पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करताच भाजपवर टीका केली. त्याशिवाय मी माझ्या घरी परत आले याचा मला खूप आनंद होत आहे, असे वक्तव्यही केलेय. माझी वाट चुकली होती, असा खोचक टोलाही यावेळी त्यांनी लगावला. शिवशरण पाटील यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
मी माझ्या घरी परत आलो, याचा मला खूप आनंद होत आहे. तेव्हा मला शिवसेना प्रमुखांनी ताईत घातलं होत आणि आज उद्धव साहेबांनी माझ्या हातात शिवबंधन बांधलं.
भाजपात गेलो ती माझी वाट चुकली होती. सोलापूरचे दोन्ही आमदार काही कामाचे नाहीत, सोलापूरला भकास केलं, दोन्ही देशमुखांच्या भांडणात सोलापूरला भकास झालं. स्वतः चं मंगल म्हणजे लोकमंगल, तंबाकू घ्यायचं आणि चुना लावायचा हेच काम केलं, असा हल्लाबोल पाटील यांनी केला.
दक्षिण सोलापुरात शिवसेनेचा आमदार करायला मी इथे आलो आहे. शिवसेनेचा आमदार झाला म्हणजे आमच्या कुटुंबातला आमदार झाला. माझा प्राण जोपर्यंत आहे, तोपर्यंत जनतेची सेवा करत राहणार आणि हा भगवा फडकवत ठेवत आहे. फडणवीस यांनी मला पद देतो म्हणाले मात्र त्यावेळी परिस्थिती वेगळी आहे. बचेंगे तो और भी लडेंगे..एका समाजावर आमदार कोणी होत नाही, त्याला कष्ट करावं लागतं, असे पाटील म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.