Amit Shah : राहुल गांधींची चौथी पीढी आली तरी...; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगलीतून काय इशारा दिला?

Amit Shah on Rahul Gandhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. कलम ३७० रद्द करण्याच्या मुद्द्यावरून अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
राहुल गांधींची चौथी पीढी आली तरी...; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगलीतून काय इशारा दिला?
Amit Shah :Saam tv
Published On

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने सभांचा धडाका लावला आहे. एकीकडे पंतप्रधान महाराष्ट्रात नरेंद्र मोदी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री अमित शहा हे सांगली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील प्रचारसभेत अमित शहा यांनी ३७० कलमाचा मुद्दा उचलून धरला आहे. राहुल गांधींची चौथी पीढी आली तरी ३७० मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे.

अमित शहा यांच्या भाषणातील मुद्दे

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान आहे. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

23 रोजी महायुती सरकार बनणार आहे. कमळ सांगलीत पुन्हा फुलणार आहे.

तुम्ही फक्त सुधीरदादाला मतदान करत नाही, तर तुमचे मत भारताला मजबूत करायचे काम करेल.

महायुतीचे सरकार आणायचे आहे का? सुधीर गाडगीळ यांना पुन्हा आमदार बनवायचे आहे ना? अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना सवाल केला.

राहुल गांधींची चौथी पीढी आली तरी...; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगलीतून काय इशारा दिला?
Yugendra Pawar Vs Ajit Pawar : बारामतीमध्ये पवारांचे शक्तीप्रदर्शन, नातवासाठी शरद पवार मैदानात, काका-पुतणे भरणार अर्ज!

सांगलीच्या गणराय, रामदासजी, मारुती आणि छत्रपतींना वंदन करून भाषणात सुरुवात करतो. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील या महापुरुषांनाही अभिवादन करतो.

370 मागे हटले नाही तर रक्ताचे पाट वाहतील, असं राहुल गांधी म्हणतात. पण काहीही होणार नाही.

पाकिस्तानमध्ये दहा दिवसात सर्जिकल स्ट्राइक करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शक्य झालं.

काँग्रेस पक्षाचे 75 वर्षापासून मंदिर उभारण्याची घोषणा करत होते. नरेंद्र मोदींनी मात्र पाच वर्षांतच अयोध्येत राम मंदिराची प्रतिष्ठानपणा केली.

राहुल गांधींची चौथी पीढी आली तरी...; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगलीतून काय इशारा दिला?
Nashik Politics: '5 लाख द्या नाही तर पराभव करेन'; शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराकडे खंडणीची मागणी

राहुल गांधी संविधान प्रचाराचा मुद्दा नाही. संविधानावर मतदान मागताय. महाराष्ट्रात एका सभेत संविधानाच्या प्रति वाटल्या गेल्या.

पहिल्या पेजवर संविधानाचा उल्लेख होता. मात्र आत या पेजेस मध्ये काहीच नव्हते.

राहुल गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा अपमान केला आहे. जे लोक नकली संविधान दाखवत आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का?

राहुल गांधींची चौथी पीढी आली तरी...; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगलीतून काय इशारा दिला?
PM Narendra Modi : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार; PM मोदींचा गंभीर आरोप

संविधान बदलण्याची आणि आरक्षणाला हात लावण्याची कुणाची हिंमत नाही. संविधान आणि आरक्षण जसेच्या तसेच राहणार आहे.

काँग्रेसचा अजेंडा हा देशाचे ध्रुवीकरण करणे आहे. काश्मीर आपला आहे ना? काँग्रेसने 370 माघारी घेऊ, असा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com