Ahmednagar Politics: थोरात यांचे संगमनेर विखेंच्या रडारवर? सुजय विखे बाळासाहेब थोरातांना आव्हान देणार?

Thorat Vs Vikhe: अहमदनगरमधून लोकसभेत पराभव झाल्यानंतर आता सुजय विखे यांनी विधानसभेसाठी इच्छा व्यक्त केलीय, संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची इच्छा सुजय विखे यांनी व्यक्त केलीय, त्यामुळे लोकसभेत पराभव झालेल्या सुजय विखे यांनी विधानसभेचं तिकीट मिळणार का?, अशी चर्चा सुरू झालीय.
Ahmednagar Politics: थोरातांचं संगमनेर विखेंच्या रडारवर? सुजय विखे बाळासाहेब थोरातांना आव्हान देणार?
Thorat Vs Vikhe
Published On

दक्षिण नगरच्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता सुजय विखे पाटील विधानसभेच्या रणांगणात उतरण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे आपले पारंपरिक राजकीय शत्रू असलेल्या थोरातांच्या विरोधातच दंड थोपटण्याचे संकेत स्वत: सुजय विखेंनी दिले आहेत. भाजपच्या वाट्याला जागा आली तर संगमनेरमधून निवडणूक लढण्यास आवडेल असं सुजय विखेंनी म्हटलंय.

Ahmednagar Politics: थोरातांचं संगमनेर विखेंच्या रडारवर? सुजय विखे बाळासाहेब थोरातांना आव्हान देणार?
Maharashtra Politics: विधानसभेत गिरीश महाजनांना मिळणार कडवं आव्हान? कोण आहेत दिलीप खोडपे? उत्तर महाराष्ट्रात काय आहे शरद पवार गटाचा प्लान?

संगमनेर हा थोरातांचा गड मानला जातो. कारण ते इथून कधीही पराभूत झालेले नाहीत. थोरात संगमनेर मतदारसंघातून 1985 पासून 2019 पर्यंत असे सलग आठ वेळा निवडून आले आहेत. 2004 मध्ये थोरात कुटुंबातील पुढची पिढी राजकारण येईल अशी चर्चा आहे. थोरातांची कन्या जयश्री थोरात राजकारणात एन्ट्री करणार निवडणूक लढवणार अशी चर्चा काही महिन्यांपासून आहे.

जयश्री थोरात यांच्या पुढाकाराने नुकताच संगमनेर शहरात भव्य महिला मेळावा पार पडला. त्यामुळे जर जयश्री थोरात मैदानात उतरल्या तर थोरात - विखे घराण्याची दुसरी पीढी आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये विखे-थोरातांमध्ये सामना रंगणार का? याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com