Maharashtra Politics: विधानसभेत गिरीश महाजनांना मिळणार कडवं आव्हान? कोण आहेत दिलीप खोडपे? उत्तर महाराष्ट्रात काय आहे शरद पवार गटाचा प्लान?

Dilip Khodpe Vs Girish Mahajan: भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्याविरोधात शरद पवार एका मातब्बर नेत्याला विधानसभेच्या रिंगण्यात उतरवण्याची शक्यता आहे.
विधानसभेत गिरीश महाजनांना मिळणार कडवं आव्हान? कोण आहेत दिलीप खोडपे? उत्तर महाराष्ट्रात काय आहे शरद पवार गटाचा प्लान?
Sharad Pawar, Dilip Khodpe, Girish MahajanSaam Tv
Published On

लोकसभा निवडणुकानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी महायुतीला रोखण्यासाठी मॅन टू मॅन मार्किंग सुरु केलंय. पवारांनी थेट भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेरमध्ये भाजपचा मातब्बर नेता गळाला लावलायं.

भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपेंना आपल्या गोटात सामील करुन घेण्यासाठी डाव टाकलायं. खोडपे पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्य़ावेळी पवारांच्या उपस्थितीत खोडपे प्रवेश करणार आहेत. याचबद्दल बोलताना माजी झेडपी अध्यक्ष दिलीप खोडपे म्हणाले की, ''शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मी महाजनांविरोधात लढणार आहे.''

विधानसभेत गिरीश महाजनांना मिळणार कडवं आव्हान? कोण आहेत दिलीप खोडपे? उत्तर महाराष्ट्रात काय आहे शरद पवार गटाचा प्लान?
Sanjay Gaikwad: ...तर मुख्यमंत्री कशाला माफी मागतील, राहुल गांधींवरील 'त्या' वक्तव्यावर संजय गायकवाड ठाम

दिलीप खोडपे कोण?

दिलीप खोडपे हे भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. जळगाव जिल्ह्यातील मराठा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल 1 लाख 40 हजार मतं आहेत. दिलीप खोडपे हे गिरीश महाजनांना तगडं आव्हान देण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभेसाठी शरद पवार मैदानात उतरले. पश्चिम महाराष्ट्रानंतर पवारांनी आता उत्तर महाराष्ट्राकडे मोर्चा वळवलाय. याची सुरूवात त्यांनी माजी मंत्री आणि भाजप आमदार जयकुमार रावलांच्या शिंदखेड्यापासून सुरूवात केलीय. पवारांनी शिंदखेड्यात घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात रावलांचे कट्टर समर्थक कामराज निकम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे रावलांना मोठा धक्का मानला जातोय.

विधानसभेत गिरीश महाजनांना मिळणार कडवं आव्हान? कोण आहेत दिलीप खोडपे? उत्तर महाराष्ट्रात काय आहे शरद पवार गटाचा प्लान?
Sanjay Gaikwad: ...तर मुख्यमंत्री कशाला माफी मागतील, राहुल गांधींवरील 'त्या' वक्तव्यावर संजय गायकवाड ठाम

आता पवारांच्या रडारवर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात पवार आणखी कोणत्या मतदारसंघामध्ये मोहरे हलवतात त्याकडे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com