Sanjay Gaikwad: ...तर मुख्यमंत्री कशाला माफी मागतील, राहुल गांधींवरील 'त्या' वक्तव्यावर संजय गायकवाड ठाम

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत.
...तर मुख्यमंत्री कशाला माफी मागतील, राहुल गांधींवरील 'त्या' वक्तव्यावर संजय गायकवाड ठाम
Sanjay Gaikwad On Rahul GandhiSaam Tv
Published On

संजय जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

''राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ'', असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज सकाळी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधकांनी गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. यावरच आता संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधताना संजय गायकवाड म्हणाले की, वक्तव्य मी केले आहे, मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री कशाला मागतील. माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे.''

...तर मुख्यमंत्री कशाला माफी मागतील, राहुल गांधींवरील 'त्या' वक्तव्यावर संजय गायकवाड ठाम
Nagpur Crime : नागपूर हादरलं! चॉकलेटचे आमिष देऊन 8 वर्षीय मुलीवर अत्याचार; अनोळखी आरोपीचे पोलिसांकडून स्केच तयार

ते म्हणाले की, ७० कोटी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे प्लॅनिंग काँग्रेसने केले आहे. काँग्रेसपेक्षा जास्त आंदोलनं आम्ही केली आहे. आम्हीही दहा हजार लोकांना आणून आंदोलन करू शकतो.''

संजय गायकवाड यांच्या गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड म्हणाले की, ''विजय वडेट्टीवार यांनी अनेक वेळा माझ्याबद्दल घाणेरड्या गोष्ठी बोलले आहेत. मी काही बोललो नाही. आधी तुमच्या नेत्याला.. राहुल गांधी याना आवर घाला. जे आरक्षण संपवण्याची भाषा करतात. आधी आपल्या नेत्याला शिकवा मग निषेध करा.''

...तर मुख्यमंत्री कशाला माफी मागतील, राहुल गांधींवरील 'त्या' वक्तव्यावर संजय गायकवाड ठाम
Accident News: नोकरीच्या शोधात निघालेल्या मजुरांच्या वाहनाची टँकरला धडक; 8 जणांचा जागीच मृत्यू, 16 जखमी

गायकवाड पुढे म्हणाले की, ''आम्ही गुन्ह्याची परवा कधी केली नाही. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवण्याकरता जर गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. याला जर गुंडगिरी म्हणता असतील तर ही गुंडगिरी मला मान्य आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com