SSC Exam: बीडमध्ये दहावीचा पेपर फुटला! उत्तरपत्रिका थेट शिक्षकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर

SSC English Paper Leak In Beed District Maharashtra: बीडमध्ये दहावीच्या इंग्रजी पेपरपूर्वी उत्तरपत्रिका शिक्षकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Alleged SSC English exam paper leak sparks controversy in Beed as authorities face questions over exam security lapses
Alleged SSC English exam paper leak sparks controversy in Beed as authorities face questions over exam security lapsesSaam Tv
Published On

बीडच्या पिंपळनेर जिल्हा परिषद सेंटरवर धक्कादायक प्रकार घडला आहे. दहावीचा आज इंग्रजीचा पेपर होता. मात्र पेपरच्या काहीवेळआधीच इंग्रजीच्या पेपरची उत्तर पत्रिका एका शिक्षकाच्या व्हाट्सअप वर व्हायरल झाली असून त्यामध्ये सेट झेरॉक्स काढण्यासाठी दोन प्रश्नांची उत्तरं पाठवण्यात आले होते. त्याचबरोबर लाईट बंद करून काही काळासाठी सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याचे माहिती समोर आली आहे.

लातूरमध्ये शिक्षक आमदाराच्या दोन्ही परीक्षा केंद्रावर नियमांची पायमल्ली

तसेच लातूरमधून अशीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लातूर तालुक्यातल्या जोडजवळा येथील समता विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर चक्क सीसीटीव्ही कॅमेरा न बसवताच विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. दरम्यान परीक्षापूर्वीच बोर्डाने परीक्षा केंद्रावर कॉपीसारखे गैरकृत्य होऊ नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर परीक्षा काळातील चित्रीकरण जतन करण्याचे आदेशही संबंधित परीक्षा केंद्रांना देण्यात आली आहेत. मात्र असे असतानाही लातूरच्या जोडजवळ येथील समता विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला नाहीत.

Alleged SSC English exam paper leak sparks controversy in Beed as authorities face questions over exam security lapses
Rajya Sabha : उमेदवार जवळपास निश्चित, ३ नेते होणार खासदार, वाचा महायुतीनं कुणाला दिली संधी?

दरम्यान ही संस्था राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांची आहे. आमदार विक्रम काळे या संस्थेचे सचिव आहेत. त्यामुळे बोर्डाचे नियम डावलून राजरोसपणे सुरू असणाऱ्या या परीक्षा केंद्रावर काय कारवाई केली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Alleged SSC English exam paper leak sparks controversy in Beed as authorities face questions over exam security lapses
Sharad Pawar : शरद पवार राज्यसभेवर जाणार का? राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याने नेमकं तेच सांगितले

बीड जिल्ह्याचे कलेक्टर विवेक जॉन्सन यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यात कॉपी मुक्त परिक्षा राबवण्यासाठी प्रत्येक वर्गात झूम मीटिंगच्या माध्यमातून प्रत्येक वर्गावर लक्ष ठेवले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र बीड जिल्ह्याच्या परळी येथे सध्या इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असून आज इंग्रजीचा पेपर सुरू आहे, आणि या पेपरला मात्र कॉपी देणाऱ्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस बंदोबस्त करण्यात आला असला तरी देखील या बंदोबस्ताला कॉपी बहाद्दर जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.

Alleged SSC English exam paper leak sparks controversy in Beed as authorities face questions over exam security lapses
अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका का झाला? आज सायंकाळी होणार स्पष्ट

तर केंद्रावर प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक वर्गात झूम मीटिंगच्या माध्यमातून मुलांच्या आणि शिक्षकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून तीन तास लक्ष असणार असल्याचे सांगण्यात आले असताना देखील कॉपी करण्याचा जोरदार प्रकार सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com