राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) सर्वेसर्वा शरद पवार स्वतः निवडणूक लढवणार का? याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी आपल्या उमेदवारीबाबत अद्याप मौन बाळगले आहे. त्यांनी हा निर्णय त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सोपवल्याचे समजतेय. काल रात्री शरद पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. पवारांनी आपल्या नेत्यांना मविआच्या घटक पक्षांशी सविस्तर चर्चा करण्याचा सल्ला दिलाय. पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलंय. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या एकत्रित निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शशिकांत शिंदे काय म्हणाले?
शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर शशिकांत शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आम्ही काही प्रमुख लोक एकत्र बसलो होतो आणि आमच्या वतीने आम्ही आमची इच्छा व्यक्त केली आहे. जशी काँग्रेस आणि शिवसेनेने मागणी केली आहे, तशीच आमचीही विनंती आहे की पवार साहेबांनी ही निवडणूक लढवावी, असे शिंदे म्हणाले.
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची प्राथमिक चर्चा झाल्यानंतर आम्ही पुन्हा पवार साहेबांशी बोलू आणि त्यांना आमचा निर्णय सांगू, असे शिंदेंनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.