Maharashtra Board Exams, : बारावीपाठोपाठ आता दहावीच्या पेपर फुटीचं रॅकेट समोर आलंय. हा पेपर सोशल मीडियाचा वापर करुन कसा फोडला जात होता? या पेपर फुटीची मोडस ऑपरेंडी कशी आहे? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या कॉपीमुक्त परीक्षेचा गाजावाजा केला. मात्र आता या कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडाल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. विशेष म्हणजे शिक्षणाचं माहेर घर असलेल्या पुण्यात चक्क परीक्षेच्या तीन दिवस आधीच बीज गणित आणि भूमितीचा पेपर फोडण्यात आला. यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला.
पेपर फुटीचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी चक्रं फिरवली... .यासाठी नेमकी काय मोडस ऑपरेंडी वापरली ते पोलिसांकडूनच ऐकूयात. हा फक्त प्रश्नपत्रिकेचा फोटो नाही. तर राज्य शिक्षण बोर्डाची वेशीला टांगलेली लक्तरं आहेत....
ही पेपरफुटीची प्रकरणं फक्त दहावीची नाहीत. तर बारावीचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणिताचे पेपर फुटल्याचं समोर आलंय... तर याच नागपूरच्या पेपरफुटीचे धागेदोरे थेट कोल्हापूरपर्यंत पोहोचलेत. कोल्हापूरच्या एका पेपरसेटरचाही यात संबंध असल्याचं उघड झालंय. ही सगळी प्रकरणं समोर आल्यानंतर आता राज्य शिक्षण मंडळ जागं झालंय.
खरंतर कॉपीमुक्त परीक्षा व्हावी म्हणून सरकारने परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले, भरारी पथकं स्थापन केले.. त्यानंतरही शिक्षण व्यवस्थेला लागलेली कॉपीची कीड संपवण्यात यश मिळत नाही... त्यामुळे आता कॉपीला खतपाणी घालणारे शिक्षक आणि पेपर फोडणारे पेपर सेटर यांच्यावर कठोर कारवाई करुन पेपर फुटीचं रॅकेट उद्ध्वस्त कऱण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.