पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकारचा शपथविधी सोहळा शनिवारी 9 मे रोजी होणार आहे. दरम्यान राजाच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र भाजप बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री बसवू शकते अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाने अद्याप अधिकृत घोषणा केलेले नसली तरी, ममता बॅनर्जी यांचा सलग दोनदा पराभव करणारे शुभेंदू अधिकारी हे या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
अग्निमित्रा पॉल
आसनसोल दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अग्निमित्रा पॉल यांनी तृणमूल काँग्रेसच्या तापस बॅनर्जी यांचा 40,839 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी महिला मोर्चाचे अध्यक्षपद भूषवले. 2021 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवून त्यांनी सयोनी घोष यांचा पराभव केला होता. राजकारणात येण्यापूर्वी त्या एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर होत्या. जानेवारी 2026 मध्येच त्यांची बंगाल भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
रूपा गांगुली
गेल्या 10 वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असलेल्या रूपा गांगुली यांनी सोनारपुर दक्षिण मतदारसंघातून TMC च्या अरुंधती मैत्रा यांचा 35 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. बी.आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारून त्या घराघरांत पोहोचल्या होत्या. 2016 ते 2022 या काळात त्या राज्यसभा खासदारही राहिल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपमध्ये लवकरच बैठकांचे सत्र सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे वरिष्ठ नेते लवकरच यावर चर्चा करतील.
शर्यतीत असलेली इतर नावे:
१.शुभेंदू अधिकारी: भवानीपूर आणि नंदीग्राममध्ये विजय मिळवला
२.शमिक भट्टाचार्य: भाजपा प्रदेशाध्यक्ष.
३.दिलीप घोष: माजी प्रदेशाध्यक्ष.
४.उत्पल महाराज: आरएसएस (RSS) चा एक महत्त्वाचा चेहरा.
बंगालमधील विधिमंडळ नेत्याच्या निवडीसाठी भाजपने गृहमंत्री अमित शाह यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे सह-निरीक्षक म्हणून काम पाहतील. हे दोन्ही नेते नवनिर्वाचित आमदारांशी चर्चा करून मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय घेतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.