थलपती विजयला कुणाची साथ? काँग्रेस-छोटे पक्ष की AIDMK देणार पाठिंबा?

Thalapathy Vijay Tvk Needs Allies For Government Tamilnadu: तामिळनाडूत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं ऐतिहासिक विजय मिळावलाय...मात्र सत्तास्थापनेसाठी टीव्हीकेला आणखी 10 आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे... अशावेळी टीव्हीकेला नेमकं कोणत्या पक्षाची साथ मिळणार? टीव्हीकेला साथ देण्यासाठी कोणते पक्ष सकारात्मक आहेत?
Thalapathy Vijay faces a crucial test as TVK seeks allies to form government in Tamil Nadu.
Thalapathy Vijay faces a crucial test as TVK seeks allies to form government in Tamil Nadu.saam tv
Published On

तब्बल पाच दशकांच्या... दोन पक्षांमध्ये विभागल्या गेलेल्या द्रविडी राजकारणाचं चक्र भेदून थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं तामिळनाडूत ऐतिहासिक विजय मिळवला...प्रस्थापितांना नाकारून तमिळनाडूच्या मतदारांनी टीव्हीकेच्या 108 उमेदवारांना निवडून दिलं...मात्र टीव्हीकेला 118ची मॅजिक फिगर गाठणं शक्य झालं नाही...त्यामुळे सत्तेत बसण्यासाठी थलपती विजयला आणखी 10 आमदारांचा पाठिंबा गरजचा आहे...तामिळनाडूच्या जनतेचा कौल नेमकं काय सांगतो...

विजय थलपतींच्या टीव्हीके पक्षाला तामिळनाडूत सर्वाधिक 108 जागा मिळाल्या...तर स्टॅलिन यांच्या DMK ला 59 आणि AIDMKनं 47 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला 5 जागांवर विजय मिळवला असून डाव्या पक्षांना 4 तर मुस्लीम लीगनं 2 जागा जिंकल्या आहेत.

त्यामुळे आता विजय यांच्या टीव्हीकेला १० जागांची जमवाजमव करावी लागणार आहे. यासाठी निकालानंतरच हालचालींना वेग आल्याचं दिसलं. सर्वात आधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विजय यांच्याशी फोनवरून सवांद साधून त्यांचं अभिनंदन केलं. मात्र भाजपसोबत असलेल्या एआयडीएमकेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष अजेंडा असलेल्या TVKला साथ देण्यासाठी काँग्रेस सकारात्मक असल्याची चर्चा आहे.

तर काँग्रेससारखेच डीएमकेसोबत लढणाऱे डावे आणि दलितांचा पक्ष म्हणून परिचित असलेला VCK ही सकारात्मक असल्याचं बोललं जातंय. या सर्वांकडे मिळून 11 आमदार आहेत. यांच्यासोबत विजय यांचं सूत जुळलं तर बहुमताचा आकडा सहज गाठता येईल.

मुळात काँग्रेसनं निवडणुकीपूर्वीच टीव्हीकेसोबत जाण्याचा पर्याय तपासून पाहिला होता. त्यामुळे डीएमके आणि काँग्रेसमध्ये तणावाचे संबंध होते. मात्र निवडणूकपूर्वी आघाडी असल्यामुळे काँग्रेस, डावे आणि व्हीसीकेसमोर डीएमकेला मनवण्याचं आव्हान आहे. कारण तामिळनाडूत 'द्रमुक'ची साथ सोडली, तर याचा थेट परिणाम केंद्रातील 'इंडिया' आघाडीवर होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस या आव्हानाला कसं सामोरं जातं आणि डावे काय भूमिका घेतात यावर टीव्हीकेचं सत्तेचं गणित अवलंबून असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com