

जेडीयूचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय झा यांनी पक्षाच्या नावाबाबत मोठा प्रस्ताव मांडला
जेडीयूचे नाव बदलून ‘जनता दल नितीश’ करण्याचा विचार करण्याचे आवाहन
खगरिया येथील ‘नितीश संवाद’ कार्यक्रमात संजय झा यांनी हा मुद्दा मांडला.
केंद्रात आणि राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या पक्षात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. आता म्हणाल पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या पदे बदलेले जातील, एनडीएमधील घटक पक्ष आपल्या नेत्यांची पदे नाही तर थेट पक्षाचं नाव बदलणार आहे. बिहारमधील सत्तेचा वाटकेरी असलेला जनता दल युनाइटेड(जेडीयू ) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांनीच पक्षाचं नाव बदलण्याचा सल्ला नेत्यांना दिलाय. ( Jdu Name Change Proposal: ‘janata Dal Nitish’ Name In Discussion)
केंद्रातील मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चेमुळे JD(U) मध्ये मंत्रिपदासाठी नेतेमंडळीकडून फिल्डिंग लावली जातेय. एकीकडे केंद्रातील फेरबदलाच्या चर्चा सुरू असताना बिहारच्या राजकारणात सध्या नामांतराचा मुद्द्यानं वातावरण तापलंय. सुरुवातीला बख्तियारपूरचे नाव बदलून 'नितीशपूर' करण्याची मागणी करण्यात आली होती आणि आता ही चर्चा थेट 'जेडीयू'च्या (JDU) नावापर्यंत पोहोचलीय.
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी पक्षाच्या नेत्यांना पक्षाचे नाव बदलाचे आवाहन केलंय. जेडी(यू)चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राज्यसभा खासदार असलेल्या संजय झा यांनी पक्षाचे नाव बदलून 'जनता दल नितिश' असे करावे, अशी विनंती पक्षाच्या नेत्यांकडे केली आहे. खगरिया येथील 'नितीश संवाद' कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी हा प्रस्ताव मांडला.
नितीश कुमार यांनी बिहारचा विकास आणि पक्षाची प्रगती यासाठी आपण पूर्ण जोमाने आणि निष्ठेने काम केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कार्याचा आणि योगदानाचा सन्मान म्हणून पक्षाला आपले नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. खगरिया येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाहा यांना उद्देशून बोलताना संजय झा यांनी अशी सूचना केली की, आता जेडी(यू) (JD-U) ची ओळख 'जनता दल नितीश' अशी असली पाहिजे.
बिहारमध्ये बख्तियारपूरचे नाव बदलून नितीश कुमार यांच्या नावावरून 'नितीशपूर' करण्याची मागणी आधीच चर्चेत होती. ही मागणी मंत्री संतोष सुमन यांनीही केली होती. याचदरम्यान संजय झा यांच्या विधानाने राजकीय चर्चेत पुन्हा एकदा भर घातली आहे. त्यामुळे बिहारमधील नामांतराचे हे राजकारण नेमके कुठपर्यंत जाणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. संजय झा यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले. जेडीयूच्या (JDU) नावात खरोखरच एखादा मोठा बदल होणार आहे, की नितीश कुमार यांच्या राजकीय योगदानाची दखल घेणारे हे केवळ एक प्रतिकात्मक विधान आहे? हे पाहावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.