

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून रेल्वे आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
सात हाय-डेन्सिटी रेल्वे कॉरिडॉरचा विस्तार करून चार मार्गिका तयार करण्याची योजना आहे.
भविष्यातील वाढती रेल्वे वाहतूक हाताळण्यासाठी मार्गिकांची क्षमता वाढवली जाणार आहे.
केंद्र सरकारने आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे प्रकल्पांबाबत मोठे निर्णय घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशाच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या महत्त्वाच्या निर्णयांबाबत प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली. देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार प्रमुख महानगरांदरम्यानची रस्ते जोडणी जागतिक दर्जाची करणे, हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचं म्हटलंय.
केंद्र सरकार रेल्वेच्या आधुनिकीकरणावर सातत्याने भर देत असून त्यापार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात आलेत. बैठकीत रेल्वेच्या आधुनिकीकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. हे प्रकल्प गेल्या १२ वर्षांपासून रेल्वेमध्ये सुरू असलेल्या व्यापक परिवर्तन आणि आधुनिकीकरणाच्या कामाचाच एक भाग असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय. सरकारनं महत्त्वाचे मार्ग चार पदरी करण्यासाठी मंजुरी दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचे रूपांतरण आणि आधुनिकीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, सात हाय-डेन्सिटी असलेल्या रेल्वे कॉरिडॉरवर चार पदरी आणि चार-मार्गी (quadruple-track) मार्ग टाकले जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचे पूर्णपणे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, सात हाय-डेन्सिट रेल्वे कॉरिडॉर्सचा विस्तार करून तिथे चार मार्गिका (ट्रॅक्स) तयार करण्याची योजना आहे. वाहतुकीच्या प्रमाणात होणारी भविष्यातील वाढ पेलण्यासाठी या कॉरिडॉर्सवरील मार्गिकांची क्षमता वाढवण्याचे काम केले जाईल.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. याच अनुषंगाने, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत रेल्वेच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन रेल्वेला अधिक सक्षम बनवणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भविष्यातील मोठ्या वाहतुकीचा ताण पेलण्यासाठी नियोजित असलेल्या इतर अनेक महत्त्वपूर्ण कॉरिडॉर्सवरही वेगाने काम सुरू आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, देशातील प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडणारे मार्ग (कॉरिडॉर्स) अपडेट केले जातील. तसेच अधिक सुलभ बनवले जातील. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, कोलकाता-दिल्ली मार्ग चार पदरी (फोर-लेन) करण्यासाठी मंजुरी देण्यात आलीय. यामुळे उत्तर भारत आणि पूर्व भारत यांच्यातील मालवाहतूक आणि प्रवासाला मोठी गती मिळेल. पूर्व आणि दक्षिण किनारपट्टीच्या भागांना उत्तम दळणवळण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चेन्नई-कोलकाता मार्गाचे चार पदरी मार्गात रूपांतर केले जाईल.
प्रवासाला अधिक सुलभ व अखंड बनवण्यासाठी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई यांच्यातील मार्गही चार पदरी केला जाणार आहे. तसेच, पश्चिम आणि दक्षिण भारतातील दोन प्रमुख औद्योगिक केंद्रांमधील दळणवळण गतिमान करण्यासाठी मुंबई-चेन्नई मार्गाचाही चार पदरी मार्गात विस्तार केला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.