Shocking News: खळबळजनक! मृत्यूनंतर चक्क १८ तासांनी महिला झाली जिवंत; डॉक्टरांनाही विश्वास बसेना, नेमकं काय घडलं?

Woman Life Returned After Death: बिहारमध्ये एक महिला मृत्यू झाल्यानंतर पुन्हा जीवंत झाली आहे. या घटनेने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
shocking news
shocking newsgoogle
Published On

Bihar Viral News

मृत्यूनंतर पुनर्जन्म होतो, हे आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. परंतु, अंत्यसंस्काराआधीच मृत पावलेली व्यक्ती जीवंत झाली तर काय होईल, असा विचार केला आहे का? अशी एक घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे. एक महिला मृत्यूच्या18 तासानंतर पुन्हा जीवंत झाली (Woman Life Returned After Death) आहे. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ या.  (latest marathi news)

छत्तीसगडमधील गढवा जिल्ह्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू (death) झाला होता. अंत्यसंस्कारासाठी तिला बिहारमधील बेगुसराय येथे आणलं जात होतं. दरम्यान, वाटेत बिहारच्या हद्दीत प्रवेश करताच ती महिला पुन्हा जीवंत झाली आहे. सध्या या महिलेवर बेगुसराय येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) या महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. बिहारच्या सीमेवर येताच ही महिला जीवंत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

काय आहे संपूर्ण प्रकरण

बेगुसराय जिल्ह्यातील नीमा चांदपुरा येथील रहिवासी रामवती देवी काही दिवसांपूर्वी मुलांसोबत छत्तीसगडला गेली होती. 11 फेब्रुवारीला रामवती देवी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला छत्तीसगडमधील एका खासगी नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल केलं. तेथे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू (woman death) झाला. मृत्यूनंतर कुटुंबीयांनी आपापसात चर्चा करून रामवतीदेवी महिलेला घरी आणून घरीच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता.

महिला पुन्हा जीवंत झाली

अंत्यसंस्कार करण्यासाठी ते खासगी वाहनाने बिहारला रवाना झाले. 18 तासांनंतर रामवती देवी बिहारच्या हद्दीत दाखल होता रामवतीदेवीच्या शरीरात काही हालचाल जाणवली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला बेगुसराय सदर रुग्णालयात (Bihar Viral News) नेलं. तिथे तपासणीदरम्यान डॉक्टरांनीही रामवतीदेवीला अजून जीवंत असल्याचं सांगितलं. यानंतर तिला तातडीने आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या महिलेवर उपचार सुरू आहेत.

डॉक्टर म्हणतात चमत्कार झाला

रामवती देवी पुन्हा जीवंत झाली आहे. त्यामुळे कुटुंबीय आनंदी आहेत. रुग्णालयाचे डॉक्टरही या प्रकरणाला चमत्कार म्हणत आहेत. 12 फेब्रुवारीला रामवतीदेवीचा मृत्यू आणि त्यानंतर 13 फेब्रुवारीला तब्बल 18 तासांनंतर त्यांचं शरीर पुन्हा जिवंत होणं, हे चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं डॉक्टरांचे म्हणणं आहे.

रामवतीदेवी यांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत घोषित केलं असावं, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला (viral news) आहे. मात्र, वाटेत वाहनात बसलेल्या झटक्यांमुळे ती पुन्हा जीवंत झाल्याचं ते म्हणत आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

shocking news
Lata Mangeshkar Death Anniversary: लता मंगेशकर यांचं पहिलं गाणं कधीच रिलीज झालं नाही; काय होतं त्यामागचं कारण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com