Director Prakash Koleri Death: प्रसिद्ध दिग्दर्शकाचा संशयास्पद मृत्यू, घरात आढळला मृतदेह

Prakash Koleri Death News : मळ्याळम सिनेसृष्टीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मळ्याळम सिनेमा दिग्दर्शक प्रकाश कोलेरी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला आहे.
Director Prakash Koleri Death
Director Prakash Koleri DeathSaam tv
Published On

Prakash Koleri Death :

सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी हाती आली आहे. मंगळवारी गायिका मल्लिका राजपूतचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं वृत्त हाती होतं. त्यानंतर आता मळ्याळम सिनेसृष्टीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मळ्याळम सिनेमा दिग्दर्शक प्रकाश कोलेरी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला आहे. (Latest marathi News)

मळ्याळम सिनेमांचे दिग्दर्शक प्रकाश कोलेरी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह केरळमधील त्यांच्या वायनाड येथील घरात आढळला आहे.

Director Prakash Koleri Death
M Manikandan: 'सर तुमची मेहनत तुमचीच आहे', प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरी चोरी, चोरट्यांनी नॅशनल अवॉर्ड परत करत मागितली माफी

शेजाऱ्यांना आला संशय

65 वर्षीय प्रकाश कोलेरी यांचा मृतदेह मंगळवारी त्यांच्या राहत्या घरी आढळला. मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक प्रकाश हे एकटेच राहत होते. मागील दोन दिवसांपासून त्यांना शेजारच्या लोकांकडून पाहिलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या घराशेजारी राहण्याऱ्या लोकांना शंका आली. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

शेजाऱ्यांना त्यांचा मृतदेह घरात आढळला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती कळवली. सध्या पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Director Prakash Koleri Death
Abhijit bichukale Music Album: व्हॅलेंटाईन डेनिमित्त अभिजीत बिचुकलेंचे चाहत्यांना गिफ्ट, रोमँटिक अंदाजमधील म्युझिक अल्बम भेटीला

चाहत्यांना बसला धक्का

मीडिया रिपोर्टनुसार, प्रकाश कोलेरी केरळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. अखेरचा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ते सिनेसृष्टीत दूर झाले. गेल्या काही वर्षांपासून सिनेसृष्टीपासून लांब होते. प्रकाश कोलेरी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या नातेवाईक आणि जवळच्या मित्रांना धक्का बसला आहे. त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली व्यक्त करत आहेत.

मल्लिका राजपूतचा मृत्यू

मंगळवारी १३ फेब्रुवारी संगीत क्षेत्रातून धक्कादायक वृत्त हाती आलं. गायिका मल्लिका राजपूतचा राहत्या घरी संशयास्पदरित्या मृतदेह आढळला. १३ फेब्रुवारीला तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळला. मल्लिका राजपूतचा मृत्यू कसा झाला, याचं कारण शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com