गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी अशी ओळख जगभर मिरवणाऱ्या लता मंगेशकर यांची आज दुसरी पुण्यतिथी. भारताच्या गानसम्राज्ञी म्हणून लता दीदींचा चाहतावर्ग जगभरात आहे. गेल्या अनेक दशकांहून लता दीदींनी आपल्या आवाजाने चाहत्यांना भारावून टाकले. जरीही लता दीदी आज आपल्यामध्ये नसल्यातरीही त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांमध्ये जीवंत आहेत. 70 वर्षांच्या करिअरमध्ये लता दीदींनी मधुर आवाजाने हजारो गाणी गायली. पण त्यांनी गायलेलं पहिलं गाणं तुम्हाला माहिती आहे का? त्यांचं ते पहिलं गाणं आजवर कधीच रिलीजच झालं नाही. चला तर जाणून घेऊया त्यांच्या पहिल्या गाण्याबद्दल (Bollywood)
लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर येथे प्रसिद्ध संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी झाला. त्यांचा एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्म झाला होता. संगीतांचं आणि सुरांचे ज्ञान त्यांना वडिलांकडून मिळाले. फार कमी लोकांना माहित असेल की लता दीदींनी त्यांच्या संगीत कारकिर्दीत पहिले गाणं "नाचू या गडे, खेलू सारी मनी हौस भरी" हे गायलं होतं. १९४२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटातील त्यांनी पहिलं गाणं गायलं होतं. पण दुर्भाग्य असं की या गाण्याचा शेवटचा भाग काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे हे गाणं रिलीज होऊ शकलं नाही. (Singer)
लता दीदींनी अनेक बड्या संगीतकारांसोबत गाणी गायली आहेत. एका गाण्याचं रेकॉर्डिंग करत असताना लता दीदी बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांनी एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता. त्यांनी सांगितलं की, “ उन्हाळा ऋतु सुरू होता. दुपारच्या वेळी आम्ही एक गाणं रेकॉर्ड करीत होतो. त्यावेळी मी संगीतकार नौशाद यांच्यासोबत एक मोठं गाणं रेकॉर्ड करत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईत काय स्थिती असते हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही.” (Lata Mangeshkar)
रेकॉर्डिंगचा किस्सा सांगत असताना दीदी पुढे म्हणाल्या, “त्यावेळी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये एअर कंडिशन नसायचे. ऐन गाण्याच्या शेवटच्या रेकॉर्डिंगवेळी स्टुडिओमधील सीलिंग फॅनंच बंद पडला आणि मी त्या गर्मीमुळे बेशुद्ध होऊन पडले.” लता मंगेशकर यांनी 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या गाण्यांना तीन राष्ट्रीय आणि चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. असं असलं तरीही त्या केव्हाही स्वत: गायलेलं गाणं ऐकलं नाही. कारण जर त्यांनी ते गाणं ऐकलं तर त्यांना त्यातल्या चुका दिसायच्या. लता दीदींना भारताचे तीनही सर्वोच्च नागरी सन्मान (भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मविभूषण) लता दीदींना मिळाले आहेत. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.