Kiran Patankar Death: 'भीमराज की बेटी' किरण पाटणकर काळाच्या पडद्याआड; आंबेडकरी चळवळीचा आवाज हरपला

Kiran Patankar Death: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्ती तेजस्वी आंदोलनाला गावागावात पोचविण्यासाठी स्वत:ला झोकून देणारे दिवंगत लोककवी नागोराव पाटणकर यांची कन्या गायिका किरण पाटणकर यांचं निधन झालं आहे.
Kiran Patankar Death
Kiran Patankar DeathSaam tv
Published On

पराग ढोबळे, नागपूर

kiran patankar No More:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्ती तेजस्वी आंदोलनाला गावागावात पोचविण्यासाठी स्वत:ला झोकून देणारे दिवंगत लोककवी नागोराव पाटणकर यांची कन्या गायिका किरण पाटणकर यांचं निधन झालं आहे. किरण पाटणकर यांचं झनबाग येथील निवासस्थानी निधन झालं. त्या ६२ वर्षांच्या होत्या. किरण पाटणकर यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

गायिका किरण पाटणकर यांचा जन्म अमरावतील जिल्ह्यातील बडनेरा येथे झाला. पुढे काही काळानंतर किरण पाटणकर या नागपूरला राहण्यास गेल्या. किरण पाटणकर यांचे वडील नागोराव लोकप्रिय कवी होते. तसेच त्यांचे भाऊ प्रकाशनाथ पाटणकर देखील प्रसिद्ध गायक आहेत.

Kiran Patankar Death
Poonam Pandey ला साथ देणाऱ्या कंपनीने मागितली जाहिर माफी, म्हणाले - 'आमचा हेतू फक्त...'

किरण पाटणकर यांना बालपणापासून गायनाची आवड होती. किरण पाटणकर यांना त्यांच्या गायकीने त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. आनंद शिंदे, जानीबाबू यांच्याशी त्यांचा कव्वालीचा सामना व्हायचा. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kiran Patankar Death
Sridevi Death Case : श्रीदेवी मृत्यू प्रकरणात PM मोदींच्या बनावट पत्राचा हवाला, सीबीआयने स्वयंघोषित गुप्तहेराविरोधात उचलले मोठे पाऊल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात किरण पाटणकर यांना भीमगीतांची फर्माईश ठरलेली असायची. किरण पाटणकर यांनी शेकडो भीमगीत गायली आहे. त्यांच्या गीताच्या कॅसेट्स लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत्या. किरण पाटणकर यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा आवाज हरपल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

Kiran Patankar Death
Abhishek Bachchan Birthday: लागोपाठ १५ चित्रपट ठरले फ्लॉप, 'रिफ्युजी' नंतर असा बनवला बॉलिवूडचा 'गुरु'

तत्पूर्वी, किरण पाटणकर यांचं 'भीमराज की बेटी मै तो जयभीमवाली हूँ' हे त्यांचे गाणे विशेष गाजले होते. त्यांनी २०१४ साली बहुजन समाज पार्टीतर्फे रामटेक लोकसभा निवडणूक लढवली होती. नागपूर महापालिकेत बसपाच्या नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com