आरस्पानी सौंदर्य आणि आपल्या कातील अदांनी आणि सोबतच डान्सनेही अनेकांच्या मनावर राज्य करणारी बेली डान्सर नोरा फतेही. खरंतर नोराने चाहत्यांच्या मनावर 'दिलबर दिलबर' गाण्याच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेय. आज ६ फेब्रुवारी रोजी नोराचा वाढदिवस. आज आपण नोराच्या वाढदिवसानिमित्त तिच्या विषयी खास गोष्टी जाणून घेऊया...
नोराची चाहत्यांमध्ये बेली डान्ससाठी विशेष ओळख आहे. नोराने आजवर अनेक टीव्ही शोमध्ये परिक्षकाची भूमिका साकारली, तिचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. खरंतर नोरा मुळची भारतीय नसून ती मुळची मोरक्कन-कॅनेडियन आहे. ज्यावेळी ती महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती, तेव्हापासूनच तिला डान्समध्ये आवड होती.
नोराने कुठलाही डान्स क्लास न लावता युट्यूबवर व्हिडिओ पाहून तिने बेली डान्स शिकला आहे. नोरा जेव्हा कॅनडातून भारतात आली त्यावेळी, तिच्याकडं फक्त ५००० रुपये होते. अभिनेत्रीने एक यशस्वी अभिनेत्री होण्यासाठी अनेक काळ खूप संघर्ष केलाय.
नोराच्या आई- वडीलांनी तिला डान्स आणि अभिनयात करिअर करण्याऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित कर असा महत्वाचा सल्ला दिला होती. पण तिने आई- वडीलांकडे लक्ष न देता, आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार मनात ठाम ठेवला.
नोराने 'रोर टायगर ऑफ सुंदरबन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. यानंतर अभिनेत्रीने मागे वळून पाहिले नाही. ओ साकी साकी, मुकाबला, सिप-सिप ते गरमी या गाण्यामध्ये तुम्हाला नोराच्या दिलखेचक डान्स मूव्ह्स पाहायला मिळतात. आज नोराने इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे आणि ती प्रत्येक प्रकारे चाहत्यांची राणी आहे.
नोरा एक प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच पण सोबत ती एक प्रसिद्ध डान्सर सुद्धा आहे. तिने बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डान्सही शिकवलाय. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून दिशा पटानी आहे. नोराने दिशाला डान्स शिकवला आहे. अवघे ५००० रूपये घेऊन आलेल्या नोराची संपत्ती कोट्यवधींची आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने मुंबईमध्ये कोट्यवधींचं आलिशान घर खरेदी केली आहे. नोराकडे स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन असून अनेक लग्झरी कार सुद्धा आहेत. नोराकडे एकूण ३५ ते ४० कोटींची संपत्ती असून आज ती यशाच्या शिखरावर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.