Girija Prabhu House
Girija Prabhu House Saam Tv

Girija Prabhu: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्रीनं २४ व्या वर्षी घेतलं घर, युनिक नेमप्लेटने वेधलं लक्ष

Girija Prabhu New House: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमध्ये (Sukh Mhanje Nakki Kay Asta Srial) गौरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गिरीजा प्रभूचे (Girija Prabhu) मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झाले.
Published on

Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial:

मुंबईमध्ये स्वत:चं हक्काचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी ते खूप मेहनत घेतात आणि आपले हे स्वप्न पूर्ण देखील करतात. काहींना हे स्वप्न पूर्ण करायला बराच कालावधी लागतो. तर काही जण अगदी कमी वयामध्ये मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करतात. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने अवघ्या २४ व्या वर्षी मुंबईमध्ये घर खरेदी केले.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमध्ये (Sukh Mhanje Nakki Kay Asta Srial) गौरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गिरीजा प्रभूचे (Girija Prabhu) मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झाले. मार्गशीष महिन्यात नव्या घरी पूजा करत गिरीजाने या नव्या घराची गूडन्यूज सर्वांना दिली होती. तिने आता आपल्या घराचे फोटो शेअर केले आहेत. सध्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार एकापाठोपाठ मुंबईमध्ये स्वप्नांचे घर खरेदी करताना दिसत आहेत. नुकताच रोहित माने, अक्षय केळकर, पृथ्वीक प्रताप, अश्विनी कासार या कलाकारांनी मुंबईमध्ये घर खरेदी केले. आता त्याच्या पाठोपाठ अभिनेत्री गिरीजा प्रभूने देखील मुंबईत हक्काचे घर खरेदी केलं. मार्गशीष महिन्यात तिने हे घर खरेदी केले होते. तेव्हाच तिने ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता गिरीजाने आपल्या नवीन घराच्या प्रवेशद्वारेचे फोटो शेअर केले आहेत. गिरीजाच्या नव्या घराच्या दारावर लावलेल्या नेमप्लेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

गिरीजाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले आहेत. लिंबू कलरच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने आपल्या नव्या घराच्या दारामध्ये उभं राहून फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये गिरीजाने आपल्या नव्या घराची नेमप्लेट दाखवली आहे. गिरीजाने नव्या घराच्या दारावर लावलेली खणाची डिझाइन असलेली नेमप्लेट खूपच आकर्षक आहे. आयताकृती आकाराच्या नेमप्लेटवर मध्यभागी मराठीमध्ये पांढऱ्या अक्षरामध्ये ‘गिरीजा प्रभू’ असे नाव लिहिण्यात आले आहे. यासोबतच या नेमप्लेटच्या खालील बाजूने घुंगरांची आकर्षक डिझाइन करण्यात आलेली आहे.

Girija Prabhu House
Poonam Pandey ला साथ देणाऱ्या कंपनीने मागितली जाहिर माफी, म्हणाले - 'आमचा हेतू फक्त...'

गिरीजाच्या या फोटोंना लाइक करत तिच्या चाहत्यांनी तिला नवीन घर घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. गिरीजा प्रभूला ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. या मालिकेमुळे गिरीजा प्रभू घराघरांमध्ये पोहचली. गिरीजा प्रभू ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. आपल्या मालिकेसोबतच तिच्या पर्सनल लाइफ विषयचे अपडेट्स ती या माध्यमातून देत असते.

Girija Prabhu House
१९ वर्षांनंतर येतोय ‘नवरा माझा नवसाचा २’, तुमच्या आवडते कलाकार मुख्य भूमिकेत; निर्मात्यांनी जाहीर केली नावं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com