

Bihar vidhan sabha election result 2025 live Update : बिहारचा बाहुबली कोण होणार? यावरून थोड्या वेळातच पडदा उठणार आहे. २४३ जागांचे सुरूवातीचे कल हातात आले आहेत. त्यामध्ये बिहारच्या जनतेने एनडीएला पसंती दर्शवल्याचे दिसतेय. सुरूवातीच्या कलानुसार, भाजप आणि JDU ला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवल्याचे दिसतेय. दुसरीकडे महागठबंधन आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. काँग्रेस उमेदवार फक्त ७ जागांवरच आघाडीवर आहेत, तर तेजस्वी यादव यांचे ३७ जागांवर उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसतेय. यामध्ये बदल होऊ शकतो, असा विश्वास महगठबंधनच्या नेत्यांकडून केला जातोय. त्याला कारण म्हणजे, १०० पेक्षा जास्त जागांवर फक्त ३ हजार पेक्षा कमी मतांचा फरक आहे. (Bihar Election Twist? Over 107 Seats in Neck-and-Neck Contest, NDA Crosses Majority Early)
सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप आणि एनडीएला मोठी आघाडी मिळाली आहे. पण यामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कारण, २४३ पैकी १०७ जागांवर काटें की टक्कर सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या जागांवर फक्त ३ हजार मतांचा फरक आहे. त्याशिवाय २४३ पैकी १३२ जागांवर मतांचा फरक ५ हजार पेक्षा कमी अंतर आहे.
सुरूवातीच्या कलांमध्ये एनडीए आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. पण ४२ जागांवर १ हजार पेक्षा कमी अंतर आहे. तर ७८ जागांवर आघाडीचे अंतर दोन हजारांपेक्षा कमी असल्याचे दिसतेय. सध्या तिसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू आहे. १८ ते २५ फेऱ्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील फेरीमध्ये मतदारांचा कौल बदलला जाऊ शकतो.
२४३ जागांवरील सुरुवातीचे कल समोर आले आहेत. त्यानुसार, एनडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसतेय. १९१ जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर फक्त ४९ जागांवर महागठबंधनला संधी मिळाली. भाजप ८०, JDU ८३, पासवान यांचा पक्ष २३, काँग्रेस ६, आरजेडी ३६ जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. आतापर्यंत फक्त दोन ते तीन फेरीचे आकडे समोर आले आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ज्या ठिकाणी रॅली घेतली, त्या ठिकाणी एनडीएला मोठा फायदा झाला आहे. योगी आदित्यनाथ यांची रॅली झालेल्या १८ मतदारसंघात एनडीए आघाडीवर आहे. बिहारमध्येही योगी फॅक्टर चालल्याचे चित्र दिसतेय.
एनडीएचे १०१ विद्यमान आमदार मैदानात उतरले होते. त्यामधील ८१ जण आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे महागठबंदनचे ७१ आमदार पुन्हा निवडणुकीत उतरले होते. पण त्यामधील फक्त १९ जणांनाच आघाडी मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.