Breaking News : तब्बल १२००० कोटींचा घोटाळा, जेपी ग्रुपच्या एमडीला ईडीने ठोकल्या बेड्या

JP Infra ₹12000 crore fraud details : ईडीने जेपी ग्रुपचे एमडी मनोज गौड यांना १२,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. घरखरेदीदारांच्या निधीचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप असून ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
ED Raid
ED Raidx
Published On
Summary
  • जेपी ग्रुपच्या मनोज गौड यांना ईडीने १२,००० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली.

  • घरखरेदीदारांच्या पैशांचा गैरवापर करून अन्य प्रकल्पात निधी वळवला असल्याचा आरोप.

  • ईडीने दिल्ली आणि मुंबईसह १५ ठिकाणी छापेमारी केली होती.

  • मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

JP Infra MD Arrested ED : १२ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जेपी जेपी इन्फ्राटेक लिमिटेडवर मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज जेपी ग्रुपचे MD मनोज गौड याच्या मुसक्या आवळल्या आहेत. जेपी असोसिएट्स लिमिटेड (जेएएल) कंपनीच्या १२,००० कोटी रुपयांच्या फसवणुकीमध्ये घर खरेदीदारांच्या निधीचा गैरवापर करण्यात मनोज गौड सहभागी होते, असा आरोप ईडीने ठेवला आहे. याप्रकणात ईडीने आज मोठी कारवाई करत गौड यांना बेड्या ठोकल्या आहेत. (JP Infratech money laundering case explained)

मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) ईडीने मे २०२५ मध्ये एक मोठी कारवा ईकेली होती. त्यावेळी ईडेन जेपी इन्फ्राटेक, जेपी असोसिएट्स आणि त्यांच्या संबंधित कंपन्यांवर छापे टाकले. एएनआयच्या वृत्तानुसार दिल्ली आणि मुंबईसह सुमारे १५ ठिकाणी त्यावेळी छापे टाकण्यात आले होते.

ED Raid
Gold Rate Today : सोन्याच्या भावात अचानक मोठी वाढ, प्रति तोळ्याला 'इतकी' किंमत; चांदी ३ दिवसात १५००० हजारांनी वाढली

जेपी कंपनीच्या विविध ठिकाणी ईडीने २३ मे २०२५ रोजी छापा मारले होते. त्यामध्ये रोख रक्कम आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, जेपी इन्फ्राटेक लिमिटेड, जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड आणि इतर कंपन्यांविरुद्ध कथित आर्थिक फसवणुकीच्या मनी लाँड्रिंग चौकशी करताना १.७० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. त्याशिवाय ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक कागदपत्रे, डिजिटल साहित्य आणि बँक रेकॉर्ड देखील जप्त केले होते.

ED Raid
Train Accident : मुंबईहून घराकडे निघाले, कसारा घाटात मृत्यूने गाठले, रेल्वेतून पडून काँग्रेस नेत्याचं निधन

रिपोर्ट्सनुसार, जेपी इन्फ्राटेक लिमिटेडने घर खरेदीदारांकडून पैसे गोळा गेले होते. त्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप ईडीकडून ठेवण्यात आला आहे. घर खरेदीदारांचे पैशाचा इतर ठिकाणी गुंतवणूक करणे, ही एक फसवणूकच आहे, त्यामुळेच ईडीकडून कारवाई करण्यात आली. २०१७ मध्ये घर खरेदीदारांनी बिल्डरविरुद्ध निषेध करण्यात आला होता. त्यांच्याकडून घेतलेले पैसे इतर प्रकल्पांमध्ये वळवल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून जेपी इन्फ्राटेक लिमिटेड (जेआयएल) च्या प्रवर्तकांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ED Raid
Bus Crash: प्रवासी बस २०० मीटर दरीत कोसळली, ३७ जणांचा मृत्यू, २४ जखमी; पेरूमध्ये भयंकर अपघात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com