मुख्यमंत्र्यांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री; आता थेट उपमुख्यमंत्री होणार, राजकीय चर्चांना उधाण

Nishant Kumar Political Entry In JDU: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी जेडीयू पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. त्यांच्या राजकारणातील एंट्रीनंतर बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून भविष्यात त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते.
Nishant Kumar joins JDU, sparking speculation about a future leadership role in Bihar politics
Nishant Kumar joins JDU, sparking speculation about a future leadership role in Bihar politicsSaam Tv
Published On

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत कुमार यांनी JDU पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांचा कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निशांत यांच्या प्रवेशादरम्यान युवकांचा विचार... दृढ निश्चय अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी पक्ष कार्यालयात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. JDU चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि केंद्रीय मंत्री ललन सिंह हे देखील उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार हे उपस्थित नव्हते.

पक्षप्रवेश केल्यानंतर निशांत कुमार म्हणाले, मी सगळ्यांना धन्यवाद देतो, आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी नक्कीच सार्थ करेल. मागच्या 20 वर्षात माझ्या वडिलांनी जे काम केले आहे. त्यावर बिहार राज्याला अभिमान आहे.

Nishant Kumar joins JDU, sparking speculation about a future leadership role in Bihar politics
बदली एक्सप्रेस सुसाट; आसाममध्ये १५ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

कोण आहे निशांत कुमार?

निशांत कुमार हे एक उच शिक्षित असून नितीश कुमार यांच्याप्रमानेच ते इंजिनियर आहे. त्यांनी रांची येथील बिर्ला इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून सॉफ्टवेअर इंजिनियर ही डिग्री मिळवली आहे. जून २०२५ मध्ये, जेडीयूचे सरचिटणीस परम हंस कुमार यांनीही निशांत कुमार यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता, निशांत कुमार यांनी पक्ष आणि राज्याच्या भल्यासाठी पुढे यावे. परम हंस कुमार म्हणाले, निशांत जी खूप शांत आणि दूरदर्शी नेते असल्याचे सिद्ध होऊ शकतात.

Nishant Kumar joins JDU, sparking speculation about a future leadership role in Bihar politics
संजय यांच्या घरी बैठकींचा धडाका; आमदार-खासदारांची गर्दी, राज्याला नवा मुख्यमंत्री, राजकारणात खळबळ

जनता दल युनायटेडचे ​​आमदार हरिनारायण सिंह यांनी अलीकडेच एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे की, नितीश कुमार १० एप्रिलनंतरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. दरम्यान, एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीद्वारे निशांत कुमार देखील आमदार बनतील. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. JDU चे आमदार हरी नारायण सिंह यांनी दावा केला आहे की, निशांत पुढील महिन्यात विधान परिषदेवर निवडून येतील.

नवीन सरकारमध्ये निशांत यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली जाईल असे मोठे वक्तव्य त्यांनी केली. नितीश कुमार यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने शनिवारी दावा केला की निशांत यांच्या वडिलांच्या राजीनाम्यानंतर स्थापन होणाऱ्या नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय सर्वांच्या संमतीने घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com