काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा महामार्गावर भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

Senior Congress Leader Dies In Bihar Road Accident: बिहारमधील बक्सर जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बुचा उपाध्याय यांचा महामार्गावरील भीषण अपघातात मृत्यू. दुचाकीला गायीची धडक बसल्याने घटना घडली.
Senior Congress leader Bucha Upadhyay died after a tragic road accident in Bihar’s Buxar district.
Senior Congress leader Bucha Upadhyay died after a tragic road accident in Bihar’s Buxar district.saam tv
Published On

बिहार: बक्सर जिल्ह्यातील चौसा प्रखंडातील खिलाफतपुर येथील काँग्रेस नेते आणि बनापुरचे माजी जिल्हाध्यक्ष बुचा उपाध्याय यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोटरसायकलवरून परतत असताना गायसोबत धडकून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Senior Congress leader Bucha Upadhyay died after a tragic road accident in Bihar’s Buxar district.
आमदाराचा तडकाफडकी राजीनामा; १११ आमदार असलेल्या पक्षात खळबळ

बक्सर कोचस महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच बणापुरचे माजी सरपंच रवींद्र नाथ उपाध्याय उर्फ (वय 65) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच चौसा नगर पंचायतसह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. खिलाफतपुर येथील वॉर्ड क्रमांक 12 मधील रहिवासी असलेले बुचा उपाध्याय हे स्वर्गीय राज किशोर यांचे पुत्र होते. साध्या आणि नम्र स्वभावामुळे ते 'बाबा' म्हणून जिल्ह्यात लोकप्रिय होते.

Senior Congress leader Bucha Upadhyay died after a tragic road accident in Bihar’s Buxar district.
Politics : राजकारणात मोठी उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावान नेत्यानं साथ सोडली; भाजपने डाव टाकला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी ते शहरातील आपल्या निवासस्थानावरून चौसाकडे मोटारसायकलने जात होते. मिश्रवलिया गावाजवळ पोहोचताच अचानक वेगाने धावत आलेल्या गायीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ते रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी तात्काळ त्यांना चौसा येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सदर रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com