आमदाराचा तडकाफडकी राजीनामा; १११ आमदार असलेल्या पक्षात खळबळ

Uttar Pradesh Politics : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मुरादाबाद जिल्ह्यातील कांठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार कमाल अख्तर यांनी विधिमंडळातील मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) पदाचा राजीनामा दिला आहे. विरोधी पक्षातील काही नेते सत्ताधारी पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
Uttar Pradesh Politics :
Kamal Akhtar resigns as Samajwadi Party chief whipsaam tv
Published On
Summary
  • समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते कमाल अख्तर यांनी मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा दिला.

  • कमाल अख्तर हे मुरादाबादच्या कांठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

  • राजीनाम्यानंतर उत्तर प्रदेशात संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना वेग आला आहे.

एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. त्याच दरम्यान उत्तर प्रदेशात राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. येथील १११ आमदार असलेल्या विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षातील आमदारानं तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आमदाराच्या राजीनाम्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

Uttar Pradesh Politics :
आणखी एक पक्ष फुटणार? बैठकीला ६० आमदारांची दांडी; पक्षप्रमुखांनी घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्र, पश्चिम बंगालनंतर उत्तर प्रदेशातही राजकीय घडामोड होणार असून विरोधी पक्षातील आमदार खासदार सत्ताधारी पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे. त्याच दरम्यान सपाचे ज्येष्ठ नेते आमदार कमाल अख्तर यांनी विधीमंडळातील मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा दिला आहे. मुरादाबादमधील कांठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते कमाल अख्तर यांनी विधीमंडळातील 'मुख्य प्रतोद' (चीफ व्हिप) पदाचा राजीनामा दिलाय.

Uttar Pradesh Politics :
Assembly Election: मविआमध्ये तिढा, शरद पवार गट अन् समाजवादी पक्ष आमने-सामने, दोन्ही पक्षाचा एकाच वेळी २ जागांवर दावा!

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार आपण हा राजीनामा दिल्याचे अख्तर यांनी सांगितले. "ते आमचे नेते आहेत आणि त्यांच्या आदेशांचे पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे," असे अख्तर म्हणाले. दरम्यान अलीकडच्या काळात त्यांच्यात आणि खासदार रुची वीरा यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती.

हा वाद मिटवण्यासाठी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काही काळापूर्वीच लखनौमध्ये त्या दोघांसोबत बैठक घेतली. हे प्रकरण निवळले असावे, असे मानले जात होतं, मात्र त्याचदरम्यान आमदार कमल अख्तर यांनी राजीनामा दिल्यानं अनेकांना धक्का बसलाय.

समाजवादी पक्षाच्या मुरादाबाद शाखेत बऱ्याच काळापासून गटबाजी सुरू होती. ही बाब पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या कानावर आली. त्यानंतर लखनौमध्ये या विषयावर एक बैठक झाली, ज्यात अखिलेश यादव यांनी दोन्ही गटांशी चर्चा केली.

या बैठकीत मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार रुची वीरा आणि कांठ मतदारसंघाचे आमदार कमाल अख्तर आमने-सामने आले होते. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासमोर दोन्ही नेत्यांनी आपआपल्या तक्रारी वाचल्या होत्या. दोन्ही नेत्यांच्या वादात अखिलेश यादव यांना हस्तक्षेप करावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com