Bihar By-Election Result: लालू प्रसाद यादव' आणि नीतीश कुमारांना NOTA पेक्षाही कमी मतं; विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर

Bihar By-Election Result : बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागल्याचं पाहायला मिळत आहेत. यात 'लालू प्रसाद यादव' आणि 'नितीश कुमार' या नावांच्या अपक्ष उमेदवारांना 'नोटा' (NOTA) पेक्षाही कमी मते मिळाली.
Bihar By-Election Result
BIHAR BYPOLL: NOTA GETS MORE VOTES THAN LALU PRASAD YADAV AND NITISH KUMAR NAME SAKESsaam tv
Published On

बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि आरजेडीच्या उमेदवारांसह अनेक अपक्ष उमेदवारही आहेत. बांकीपूर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण ३१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यात काही अपक्ष उमेदवार असून त्यात लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार नावाचे दोन उमेदवार आहेत. हे अपक्ष उमेदवार आपल्या नावामुळे चर्चेत आहेत, शिवाय ते आता त्यांना मिळालेल्या मतांमुळे पुन्हा चर्चेत आलेत.

सकाळपासून मतमोजणी सुरू झाली असून आता मतमोजणीची १९ वी फेरी चालू आहे. या १९ व्या फेरीपर्यंत अपक्ष उमेदवार लालू प्रसाद यादव यांना ५४ मते मिळाली आहेत, तर नितीश कुमार यांनी ८८ मते मिळवली आहेत—ही संख्या 'नोटा' (NOTA) साठी पडलेल्या मतांपेक्षाही कमी आहे. विशेष म्हणजे, १९ व्या फेरीपर्यंत 'नोटा'साठी ३९१ मते पडली होती.

बांकीपूर पोटनिवडणुकीत कोण आहे आघाडीवर

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान 'जन सुराज पक्षा'चे उमेदवार प्रशांत किशोर हे आघाडी आहेत. मतमोजणीच्या १९ व्या फेरीअखेर प्रशांत किशोर यांनी भाजपचे नीरज कुमार सिन्हा यांच्यावर ११,२८९ मतांची आघाडी घेतली होती. दरम्यान, 'जन सुराज पक्षा'च्या मुख्यालयात समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कोणाला किती मते मिळाली?

मतमोजणीच्या १९ व्या फेरीअखेर राजकीय रणनीतीकार ते राजकारणी बनलेल्या प्रशांत किशोर यांनी ३८,२०१ मते मिळवली होती. तर नीरज सिन्हा यांना २६,९१२ मते मिळाली. दरम्यान, आरजेडीच्या उमेदवार रेखा गुप्ता यांना ९,७९५ मते मिळाली आणि त्या तिसऱ्या स्थानावर राहिल्या. बांकीपूर पोटनिवडणुकीची मतमोजणीचे ३१ फेऱ्या होणार आहेत. आज समोवार सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू झालीय.

पोटनिवडणूक का घेण्यात आली?

भाजपचे नेते नितीन नवीन यांच्या राजीनाम्यानंतर येथील जागा रिक्त झाली होती. त्यामुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. एप्रिल महिन्यात नितीन नवीन राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर ही पोटनिवडणूक घ्यावी लागली. भाजपने आपल्या युवा आघाडीतील तुलनेने कमी परिचित नेते नीरज कुमार सिन्हा यांना या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com