३२ वर्षांची साथ सोडली, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश; राजकारणात मोठी उलथापालथ

Bhupen Kumar Bora Joins BJP After Quitting Congress: आसाममधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेन कुमार बोरा यांनी ३२ वर्षांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीपूर्वी झालेल्या या निर्णयामुळे आसामच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Former Assam Congress President Bhupen Kumar Bora joins BJP in Guwahati in the presence of senior party leaders.
Former Assam Congress President Bhupen Kumar Bora joins BJP in Guwahati in the presence of senior party leaders.Saam Tv
Published On

आसामच्या राजकरणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मार्च किंवा एप्रिलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे असे सूत्रांनी सांगितले असून निवडणूक आयोगाने कुठलीही अधिकृत घोषणा केली नाहीये. मात्र निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी आज भाजपमध्ये अधिकृतरित्या पक्ष प्रवेश केला आहे. गुवाहाटी येथील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी काँग्रेससोबतचा 32 वर्षांचा प्रवास संपल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे.

Former Assam Congress President Bhupen Kumar Bora joins BJP in Guwahati in the presence of senior party leaders.
२८ वर्षांच्या तरुणीचं ६० वर्षीय मॅनेजरशी सूत जुळलं; दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, फोटो व्हायरल झाल्यानंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ

भूपेन कुमार बोरा हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्याने आसामच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सैकिया, खासदार बैजयंत पांडा आणि राज्यमंत्री जयंत मल्ल बरूआ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

Former Assam Congress President Bhupen Kumar Bora joins BJP in Guwahati in the presence of senior party leaders.
दादा माफ करा, मला मरायचं नव्हतं…, शिक्षकाने आयुष्य संपवलं, व्हिडिओसह ४ पानी सुसाइड नोट

३२ वर्षांचे नाते हे रक्ताने माखलेले

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच भूपेन बोरा यांनी काँग्रेसवर विशेषतः विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. पुढे भूपेन बोरा म्हणाले की त्यांनी ३२ वर्षे पूर्ण प्रामाणिकपणा आणि मनापासून पक्षाची सेवा केली आहे, परंतु काँग्रेस पक्ष आता त्याच्या मूळ तत्वापासून दूर गेला आहे. बोरा यांनी बोलताना अत्यंत गंभीर विधान केले, आज मी जे कपडे घातले आहेत. ते माझ्या रक्ताने माखलेले आहेत. हे रक्त राहुल गांधींच्या उपस्थितीत सांडले गेले. असे भयानक वक्तव्य भूपेन बोरा यांनी केले आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आले. भूपेन बोरा यांनी आरोप केला की काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अभिमान आणि स्वाभिमानाच्या बाबींवर तडजोड करत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी काँग्रेसवर केले.

Former Assam Congress President Bhupen Kumar Bora joins BJP in Guwahati in the presence of senior party leaders.
काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

पक्षप्रवेशाआधी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट

भूपेन बोरा यांच्या भाजप पक्षप्रवेशाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. दोन दिवसापूर्वीच त्यांनी गुवाहाटी येथे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या समवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यावेळी बोरा यांनी ही भेट सदिच्छ भेट असल्याचे सांगत, त्या भेटीमुळे भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. यामुळे चर्चांना उधाण देखील आले. राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला तेव्हा पक्षाच्या हायकमांडने तो स्वीकारले नाही. राहुल गांधींनी त्यांना वैयक्तिकरित्या फोन करून त्यांच्या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले आणि अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या निवासस्थानीही गेले. मात्र मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावरील त्यांचा वाढता विश्वास त्यांच्या परतीचे सर्व मार्ग बंद करत होता. अखेर राहुल गांधींचे प्रयत्न सपशेल फोल ठरले आणि बोरा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com