दादा माफ करा, मला मरायचं नव्हतं…, शिक्षकाने आयुष्य संपवलं, व्हिडिओसह ४ पानी सुसाइड नोट

Krishna Mohan Singh Suicide Video Full Details: उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे शिक्षक कृष्ण मोहन सिंह यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी भावनिक व्हिडिओ आणि चार पानी सुसाइड नोट लिहून शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.
Police investigate the residence in Shivpur Shahbazganj, Gorakhpur, after a teacher allegedly died by suicide leaving behind a video and a four-page note.
Police investigate the residence in Shivpur Shahbazganj, Gorakhpur, after a teacher allegedly died by suicide leaving behind a video and a four-page note.Saam Tv
Published On

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका शिक्षकाच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुलरिहा परिसरातील शिवपूर शहबाजगंज येथे राहणारे शिक्षक कृष्ण मोहन सिंह यांनी शनिवारी गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक भावनिक व्हिडिओ तयार केला तसेच चार पानी सुसाइड नोट लिहून ठेवली असून त्यात शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Police investigate the residence in Shivpur Shahbazganj, Gorakhpur, after a teacher allegedly died by suicide leaving behind a video and a four-page note.
सहाय्यक उपनिरीक्षक आणि होमगार्डची गोळ्या झाडून हत्या; पोलीस दलात खळबळ

व्हायरल व्हिडिओमध्ये मृत शिक्षकांची व्यथा स्पष्टपणे दिसून येते. अत्यंत भावनिक होत त्यांनी म्हटले आहे, दादा मला माफ करा. मला मरायचे नव्हते. मला माझी बायको आणि मुल बाळांसाठी जगायचे होते, पण मला मरायला भाग पाडले गेले. माझे 16 लाख रुपये बुडाले. कृष्ण मोहन सिंह यांनी आरोप केला आहे की, शिक्षण विभागातील नोकरी आणि इतर कामांसाठी त्यांनी देवरिया येथील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना आणि बाबूंना पत्नीचे दागिने गहाण ठेवून आणि बँकेतून कर्ज काढून तब्बल 16 लाख रुपये दिले होते. मात्र काम न झाल्याने आणि पैसे परत न मिळाल्याने ते मानसिकदृष्ट्या खचले होते.

Police investigate the residence in Shivpur Shahbazganj, Gorakhpur, after a teacher allegedly died by suicide leaving behind a video and a four-page note.
काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

निष्पाप लेकरांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले

मृत कृष्ण मोहन सिंह हे यांना तीन भाऊ होते. त्यांचा मोठा भाऊ परदेशात राहतो. त्यांच्या पश्चात पत्नी गुडिया सिंह, 8 वर्षांची मुलगी आस्था आणि 6 वर्षांचा मुलगा आदित्य असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच गुलरिहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवला. 22 फेब्रुवारी 2026 रोजी मृत शिक्षकांच्या पत्नी गुडिया सिंह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Police investigate the residence in Shivpur Shahbazganj, Gorakhpur, after a teacher allegedly died by suicide leaving behind a video and a four-page note.
काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

पोलीस अधिकारी रवि कुमार सिंह यांनी सांगितले की, सुसाइड नोट आणि व्हिडिओ हे महत्त्वाचे पुरावे म्हणून जप्त करण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com