Crime: शेतकरी नेत्याची गोळ्या झाडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

Farmer Leader Shot Dead in Bihar: बिहारमध्ये शेतकरी नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुझ्झपरपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
Crime: शेतकरी नेत्याची गोळ्या झाडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ
Saam Tv
Published On
  • बिहारमधील मुजफ्फरपूर येथे शेतकरी नेते राजू चौधरी यांची हत्या

  • दोघांनी गोळ्या झाडून जागीच संपवलं

  • डोक्यात आणि मानेत गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाला

  • राजू चौधरी हे बोचहां ब्लॉकचे शेतकरी अध्यक्ष होते

बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये शेतकरी नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बोचहां पोलिस स्टेशन हद्दीतील सरफुद्दीनपूर चलेकेलाल गावामध्ये मंगळवारी दुपारी ही घटना घडली. दुकानाजवळ बसलेले शेतकरी नेते राजू चौधरी (४५ वर्षे) यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. दोन गोळ्या लागल्यामुळे शेतकरी नेत्याचा जागीच मृत्यू झाला. ते बोचहां ब्लॉकचे शेतकरी अध्यक्ष होते. शेती क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना बिहार सरकारकडून गौरवण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचा सन्मान केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू चौधरी हे त्यांच्या घराजवळील किराणा दुकानात बसले होते. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामधील दोन गोळ्या त्यांच्या डोक्यात आणि मानेत घुसली. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. गोळी लागल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. गोळीबाराचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल पोलिसांनी घटनेची माहिती दिली.

Crime: शेतकरी नेत्याची गोळ्या झाडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ
Mumbai Crime: मुंबईमध्ये रक्तरंजित थरार! भरदिवसा चौघांवर जीवघेणा हल्ला, चाकूने सपासप वार; एकाचा जागीच मृत्यू

गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिक गावकऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रक्तबंबाळ झालेल्या राजू चौधरी यांना पटकन उचलून मुझफ्फरपूर येथील एसकेएमसीएचमध्ये दाखल केले. पण उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राजू चौधरी यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Crime: शेतकरी नेत्याची गोळ्या झाडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ
Pune Crime : व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, धक्कादायक कारण उघड

घटनेची माहिती मुळताच मुझफ्फरपूरचे ग्रामीण पोलिस अधीक्षक राजेश सिंह प्रभाकर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. घटनास्थळावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आपल्या वडिलांचे कुणासोबतही वैर नव्हते, अशी माहिती राजू चौधरी यांच्या मुलाने दिली.

Crime: शेतकरी नेत्याची गोळ्या झाडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ
Crime News: आठवीतील विद्यार्थिनीला बळजबरी दारू पाजली; नंतर हॉटेलमध्ये घेऊन गेले अन्... धक्कादायक कृत्यानं खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com