Crime News: पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमधील कबिगुरु परिसरातील एका हॉटेलमध्ये आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात सोमवारी पोलिसांनी महत्त्वपूर्ण कायदेशीर कारवाई केली. कडक सुरक्षा व्यवस्थेत, पोलिसांनी अटक केलेली मुख्य सूत्रधार महिला, हॉटेलचा मॅनेजर आणि इतर दोन मुख्य आरोपींना दुर्गापूर उप-विभागीय न्यायालयात हजर केले. या गंभीर गुन्ह्याचे स्वरूप पाहता, संपूर्ण घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी मागितली. मॅनेजर
न्यायालयात हजर करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पीडितेला आमिष दाखवून गुंगीचे औषध देणारी मुख्य आरोपी सिमरन तामांग, सामूहिक बलात्कारातील आरोपी अजरुद्दीन मल्लिक आणि सुबीर दास, तसेच हॉटेल मॅनेजर राजकुमार दे यांचा समावेश आहे. सुनावणीदरम्यान, सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की, हा गुन्हा एका अल्पवयीन मुलीविरुद्ध हेतुपुरस्सर रचलेल्या कटाचा भाग म्हणून करण्यात आला आहे आणि म्हणूनच, आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कारासोबतच पॉक्सो कायद्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. पीडितेला बेशुद्ध करण्यासाठी वापरलेले नेशेचे पदार्थाचा कुठून आणि कसे आणले याची चौकशी पोलिसांना करायची आहे. तसेच हॉटेल मॅनेजर राजकुमार डे यांचाही या प्रकरणात सहभाग होता का? तसेच वैध ओळखपत्र किंवा योग्य पडताळणीशिवाय एका अल्पवयीन मुलीला हॉटेलच्या खोलीत प्रवेश कसा दिला याची तपासणी करायची आहे.
संपूर्ण प्रकार कसा घटला?
बुडबुड भागातील रहिवासी सिमरन तामांग हिच्यावर तिच्या ओळखीच्या आठवीच्या विद्यार्थिनीला दुर्गापूरला बोलावल्याचा आरोप झाल्यावर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. तिथे त्या विद्यार्थिनीला जबरदस्तीने दारूमध्ये गुंगीचे औषध देण्यात आले आणि ती बेशुद्ध झाल्यावर हॉटेलमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर आरोपींनी पीडितेला बुडबुड बायपासवर सोडून पळ काढला. नंतर एका टोटो चालकाने तिला सुखरूप घरी पोहोचवले. या घटनेमुळे सोमवारी दुर्गापूर न्यायालयाच्या परिसरात संताप आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.